June Bank Holidays 2025 : जून २०२५ मध्ये विविध सण, उत्सव व नियमित साप्ताहिक सुट्या यांमुळे बँका तब्बल १३ दिवस बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून जून महिन्यातील सुट्यांची यादी जारीर करण्यात आली आहे.
यातील काही सुट्या काही राज्यांतच असल्यामुळे राज्यनिहाय सुट्यांची संख्या कमीअधिक होऊ शकते. लोकांना बँकेशी संबंधित कामे पार पाडण्यात अडचणी येऊ नये, यासाठी ही खबरदारी रिझर्व्ह बँकेकडून घेतली जाते. दैनंदिन गरजांच्या अनुषंगानेच आपल्या आर्थिक कामांचे नियोजन जूनमधील सुट्यांच्या दृष्टीने करावे, असे आवाहन रिझर्व्ह बँकेच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.
‘या’ कारणांमुळे कामकाज असेल बंद
१ जून रविवार, (देशभर), ६ जून ईद-उल-अधा / बकरीद (अनेक राज्यांत) , ७ जून: ईद-उल-अधा / बकरीद (अनेक राज्यांत),
८ जून रविवार (देशभर), ११ जून संत कबीर जयंती (गंगटोक, सिमला), १४ जून : दुसरा शनिवार (देशभर), १५ जून : रविवार (देशभर) ,
२१ जून : वटपौर्णिमा (महाराष्ट्रासह काही राज्यांत) , २२ जून : रविवार (देशभर) , २६ जून : जम्मू-काश्मीर स्थापना दिन (जम्मू-काश्मीर) ,
२८ जून : चौथा शनिवार (देशभर) , २९ जून : रविवार (देशभर) , ३० जून : रेमना नी (मिझोरम)
तसेच सुट्ट्यांच्या काळात डेबिट, क्रेडिट कार्डे, मोबाइल बँकिंग, यूपीआय सेवा व ऑनलाइन बैंकिंग व्यवस्था नेहमीप्रमाणेच कार्यरत राहणार आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे.
३ हजार कर्मचाऱ्यांना व्होल्वो देणार नारळ
स्टॉकहोम : स्वीडनची कंपनी ‘वोल्वो कार्स’ आपल्या ३ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. खर्च कपात करण्यासाठी हा निर्णय कंपनीने घेतला. कंपनीने सोमवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, कर्मचारी कपातीच्या यादीतील १,२०० कर्मचारी स्वीडनचे आहेत. सल्लागार संस्थांनी भरलेली आणखी १ हजार पदे समाप्त करण्यात येत आहेत. यातीलही बहुतांश कपात स्वीडनमध्येच होईल. उर्वरित कर्मचारी अन्य देशांतील असतील. वोल्व्हो कार्सचे अध्यक्ष तथा सीईओ हाकन सॅमुएलसन यांनी सांगितले की, कर्मचारी कपातीचा निर्णय कठोर आहे. तथापि, आम्ही एक मजबूत आणि लवचिक कंपनी निर्माण करू इच्छितो. त्यासाठी हा निर्णय आवश्यक आहे.