Bank Holidays : मार्च महिना हा २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्यामुळे बँकांसंबंधित महत्त्वाच्या कामांसाठी नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मार्च महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. या महिन्यात विविध सण, सरकारी सुट्ट्या आणि वीकेंडमुळे तब्बल १३ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपली आर्थिक कामे आधीच पूर्ण करण्याचा सल्ला दिला जात आहे.
मार्च महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी
१) २ मार्च २०२५ (रविवार)
साप्ताहिक सुट्टीमुळे देशभरातील सर्व बँका बंद असणार आहेत.
हेही वाचा : फलटणला जाण्यासाठी आली अन् घात झाला, तरुणीसोबत नेमकं काय घडलं?
२) ७ मार्च २०२५
मिझोराममध्ये चापचर कुट फेस्टिवल निमित्त बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
३) ८ मार्च २०२५ (दुसरा शनिवार)
दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सर्व बँका बंद असतात, त्यामुळे देशभरातील बँका या दिवशी काम करणार नाहीत.
४) ९ मार्च २०२५ (रविवार)
साप्ताहिक सुट्टीमुळे सर्व बँका बंद राहतील.
हेही वाचा : गंगेच्या घाटावर सुटकेसमध्ये सापडला महिलेचा मृतदेह, दोन महिलांना अटक
५) १३ मार्च २०२५
होलिका दहन निमित्त उत्तर प्रदेश, केरळ, झारखंड आणि उत्तराखंडमधील बँका बंद राहतील.
६) १४ मार्च २०२५
धुलिवंदन निमित्त देशभरातील बहुतेक बँका बंद असतील. मात्र, केरळ, कर्नाटक, ओडिशा आणि मणिपूर येथे बँका सुरू राहतील.
७) १६ मार्च २०२५ (रविवार)
साप्ताहिक सुट्टीमुळे सर्व बँका बंद असतील.
८) २२ मार्च २०२५
बिहार दिवस निमित्त बिहारमधील बँका बंद राहतील. यासोबत चौथा शनिवार असल्यामुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
९) २३ मार्च २०२५ (रविवार)
साप्ताहिक सुट्टीमुळे बँका बंद राहतील.
१०) २७ मार्च २०२५
जम्मू-काश्मीरमध्ये शब-ए-कद्र निमित्त बँका बंद राहतील.
११) २८ मार्च २०२५
जम्मू-काश्मीरमध्ये जमात-उल-विदा निमित्त बँका बंद राहतील.
१२) ३० मार्च २०२५ (रविवार)
रविवारच्या साप्ताहिक सुट्टीमुळे बँका बंद असतील.
१३) ३१ मार्च २०२५
देशभरात रमजान ईद (ईद-उल-फितर) निमित्त सर्व बँका बंद राहतील.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
मार्च महिन्यात बँकांच्या सततच्या सुट्ट्या असल्याने महत्त्वाची आर्थिक कामे आधीच आटोपण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू राहतील, मात्र रोख व्यवहार, चेक जमा करणे किंवा इतर बँकिंग कामांसाठी नागरिकांनी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
ऑनलाइन बँकिंग, UPI आणि ATM सेवा सुरू राहतील, मात्र मोठ्या व्यवहारांसाठी वेळेत तयारी करा.
बँक शाखेत जाऊन करायच्या व्यवहारांसाठी वरील यादीनुसार सुट्ट्या तपासून वेळ नियोजन करा.
महिना अखेरीस आर्थिक वर्ष संपत असल्याने बँकेत मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शक्यतो लवकरात लवकर काम पूर्ण करा.
मार्च महिन्यातील सुट्ट्यांमुळे होणाऱ्या गैरसोयी टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य नियोजन करून आपली आर्थिक कामे वेळेत आटोपावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.