– डॉ. उदय निरगुडकर
Banned Plastic वर्षभरापूर्वी देशात प्लॅस्टिक बंदी लागू झाली आणि बघता बघता दैनंदिन जीवनातल्या प्लॅस्टिकच्या अनेक वस्तू गायब झाल्या. नारळपाणी पिताना प्लॅस्टिकच्या स्ट्रॉची जागा कागदी स्ट्रॉने घेतली. मॉलमध्ये खरेदी करताना प्लॅस्टिकऐवजी कापडाच्या पिशव्या मिळू लागल्या. Banned Plastic बहुतांश ठिकाणी पॅक्ड फूड घेताना प्लॅस्टिकच्या डब्यांऐवजी बायोडिग्रेडेबल डबे वापरात आले. लग्न समारंभात दिसणा-या थर्माकोलच्या ताटल्या आणि प्लॅस्टिकचे चमचे गायब झाले. पण हे सगळे काही दिवस टिकले आणि पुन्हा या सर्व गोष्टी सर्रास दिसायला लागल्या. Banned Plastic याच प्लॅस्टिकच्या वस्तू मग कच-यात जातात आणि कचरा नाल्यात येऊन साचतो. त्यातूनच नाले तुंबायला सुरुवात होते आणि शहरात पावसाळ्यात पूरसदृश स्थिती निर्माण होते. वर्षानुवर्ष घडत होते, ते एका स्वल्पविरामानंतर सर्रास दिसू लागले. Banned Plastic कोणत्याही ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळी अन्नपदार्थ खाऊन रॅपर्स टाकून दिलेली आढळतात.
दरवर्षी पावसाळ्यात समुद्राच्या तुफानी लाटा हा सगळा कचरा पुन्हा रस्त्यावर आणून टाकतात. Banned Plastic असा समुद्रामध्ये टाकलेला अनेक टन कचरा आणि त्यामुळे भरलेला मरीन ड्राईव्ह हे दृश्य माध्यमे दाखवत आली आहेत. बंदी आल्यानंतर काही दिवस प्लॅस्टिकच्या वस्तू, पिशव्या पुरवणा-या कंपन्यांवर भार आला. महानगर पालिकेला दंडात्मक कारवाईसाठी धन्यवादही मिळाले. या सगळ्याला एक वर्ष झाले तरी प्लॅस्टिक बंदी परिणामकारक होत नाही, हेच वास्तव पुढे आले आहे. Banned Plastic प्लॅस्टिक बंदी का बरे यशस्वी होत नाही? प्लॅस्टिक पिशव्यांमधून आणि सिंगल युज कंटेनरमधून मिळणा-या वस्तू ‘कारवाईप्रूफ’ आहेत का? त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे? प्लॅस्टिकचे विघटन व्हायला हजारो वर्षे लागतात. मग पृथ्वीवर पर्यावरणीय धोका निर्माण करायचा अधिकार त्यांना कोणी दिला? या सगळ्यामुळे प्लॅस्टिकचे उत्पादन आणि वापर हा पर्यावरण रक्षणामधील खूप मोठा प्रश्न बनला आहे, यात शंकाच नाही. याची बंदी परिणामकारक होत नाही. Banned Plastic त्यामुळे प्रश्नाची तीव्रता वाढली आहे. या प्लॅस्टिकचे रिसायकलिंग का बरे केले जात नाही? सिंगल युज प्लॅस्टिकचे उत्पादनच बंद का केले जात नाही? ते शक्य नाही की सत्यात उतरवण्याची इच्छाशक्ती नाही? का त्याची अंमलबजावणी अपरिहार्य आहे?
मग परदेशात हे प्रयोग यशस्वी कसे झाले आणि वैयक्तिक पातळीवर अनेक कुटुंबांनी छोट्या-मोठ्या सोसायट्यांनी सिंगल युज प्लॅस्टिक बंदी यशस्वी केली; त्या प्रयोगांचे काय? पुण्यात मेधा ताडपत्रीकर या संशोधक उद्योजिका घरोघरी जाऊन प्लॅस्टिक गोळा करतात आणि त्यातून पेट्रोल निर्माण करतात. Banned Plastic असे प्रयोग मोठ्या प्रमाणावर पुण्यात इतरत्र आणि महाराष्ट्राच्या उर्वरित भागात का बरे केले जात नाहीत? प्लॅस्टिकशिवाय एकही दिवस जाऊ शकत नाही, अशी आपली जीवनशैली आहे. असे असले तरी अनेक घरांमधून प्लॅस्टिक रिसायकल केले जाते. ठाण्याचे कौस्तुभ ताम्हणकर गेली २५ वर्षे शून्य कचरा मोहीम राबवत आहेत. त्यांच्या घरातून कुठलीच गोष्ट कचरा म्हणून बाहेर टाकली जात नाही. तसा बोर्डच त्यांनी घरावर चिकटवला आहे. उरलेले अन्न, भाज्यांचे देठ यापासून ते खत बनवतात आणि दुधाच्या रिकाम्या पिशव्यांपासून गाद्या, उशा आणि लोड अशा वस्तू बनवतात. Banned Plastic अशा शेकडो अभिनव कल्पना त्यांनी राबविल्या आहेत. पण असे चांगले प्रयोग माध्यमांच्या पसंतीला वर्ज्य ठरतात. परिणामी ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. विघटन होऊ शकणारा आणि विघटन न होणारा म्हणजेच ओला आणि सुका कचरा अशा वर्गीकरणाच्या बाबतीत आपल्याकडे लोकशिक्षणाची गरज आहे.
याचे कारण प्लॅस्टिकचा कचरा निर्माण करणा-या राष्ट्रांच्या यादीत आपला क्रमांक खूप वरचा आहे. या देशात वर्षाला ३५ लाख टन प्लॅस्टिकचा कचरा गोळा होतो आणि त्यातील फक्त ३० टक्के रिसायकल होतो. सर्रास मिळणा-या प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या खरे तर रिसायकल करायला सर्वात सोप्या. Banned Plastic पण इथेही आपण कमी पडत आहोत. कच-याची अर्थव्यवस्था ही आज फार मोठी संपत्ती निर्माण करणारी इंडस्ट्री आहे. साध्या पाण्याच्या प्लॅस्टिक बाटल्यांचा दर किलोला ४० ते ४५ रुपये एवढा आहे. असे असूनही प्लॅस्टिकचा कचरा आणि त्यातून निर्माण होणारे प्रदूषण ही मोठी समस्या आहे. आज खरेदी-विक्रीला दुकानात गेले की, अनेक ठिकाणी अत्यंत माफक किमतीत कापडाच्या अथवा कागदाच्या थैल्या मिळतात. तरीदेखील २० मॅक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर कमी झाला आहे, असे काही दिसत नाही. तसे पाहिले तर ही प्लॅस्टिक बंदी आपल्याकडे गेली १० वर्षे आहे. पण या क्षेत्रातले ठोक विक्रेते सांगतात, सिंगल युज प्लॅस्टिकचा पुरवठा आणि मागणी कमी झाली आहे, असे काही दिसत नाही. ते या सगळ्याकडे एका रुक्ष व्यावहारिक नजरेने पाहतात. Banned Plastic बनवणारे बनवतात, वापरणारे वापरतात म्हणून विकणारे आम्ही ते विकत असतो, असे बिझनेस लॉजिक ते समोर मांडतात. खरे तर कचरा व्यवस्थापन गेल्या काही वर्षांमध्ये अत्यंत आधुनिक आणि तंत्रज्ञानस्नेही बनले आहे. या व्यवसायातील गुंतवणूक दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
माझ्याच माहितीत उत्तम तंत्रज्ञान आणि मोठी क्षमता असलेल्या पाच-सहा कंपन्या चांगल्या चालू आहेत. पण तरीही qसगल युज प्लॅस्टिक बंदीनंतर त्याचे उत्पादन आणि मागणी ३० ते ४० टक्क्यांनी घटेल, हा अंदाज साफ चुकीचा ठरला. त्यांच्या उत्पादनामध्ये जेमतेम पाच-दहा टक्के फरक पडला. कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील गुंतवणूक वाढत आहे तशी गेल्या पाच वर्षांमध्ये प्लॅस्टिकच्या कच-यातही दुपटीने वाढ झालेली दिसत आहे. ही दोन्ही चित्रे एकाच वेळी आपल्या डोळ्यांसमोर आहेत. Banned Plastic तरी त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे आपल्या देशात दरडोई प्लॅस्टिकचा वापर वर्षाला ११ किलो इतका आहे. हीच आकडेवारी जगातील लोकसंख्येच्या सरासरीमध्ये दरडोई २८ किलो इतकी आहे आणि ही प्रगत देशातील मंडळी आम्हाला वसुंधरा परिषदेत पर्यावरण रक्षणाचे खडे बोल सुनावतात तेव्हा हसायला येते. भारताच्या आर्थिक विकासाचा दर वाढतोय तसाच दरडोई प्लॅस्टिकचा वापरही वाढतोय. विकासाची ही काळी बाजू चिंतेत भर पाडणारी आहे. या सगळ्यावर उपाय म्हणून आता विघटन होणारे प्लॅस्टिक उपलब्ध झाले आहे. Banned Plastic त्यातही काही समाजकंटक साधे प्लॅस्टिक बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिक म्हणून खपवत आहेत. त्यांना शिक्षा झाली तरच जरब बसेल आणि तशीच जरब नागरिकांना कच-याचे वर्गीकरण करण्यासाठी बसवायला हवी.
या बाबतीत परदेशातील काही देशांमध्ये प्रदूषण करणारे त्याची भरपाई करतात, हे परिणामकारक सूत्र आपणही राबवायला हवे. ईशान्येकडील अनेक राज्यांमध्ये रस्त्यावर जागोजागी जाळीचे पिंजरे दिसतात. Banned Plastic त्यात नागरिक अत्यंत शिस्तीने आपल्याकडचा प्लॅस्टिकचा कचरा जमा करतात. ही जाणीव जशी नागरिकांना हवी तशीच आपल्या जबाबदारीची जाणीव आपला माल विकणा-या मोठमोठ्या कंपन्यांनाही करून द्यायला हवी. गोदरेज आणि बॉईस या कंपनींनी आपले बहुतांश पॅकिंग मटेरियल रिसायकल केलेल्या उत्पादनातून वापरण्यावर कटाक्ष ठेवला आहे. अशा नवनवीन गोष्टी आणि त्यांचा प्रसार सर्वदूर पोहोचणे अपेक्षित आहे तरच प्लॅस्टिक फूटप्रिंट कमी होईल. कचरा गोळा करणे, त्याचे ओला-सुका असे वर्गीकरण करणे आणि मग पर्यावरणीय दक्षता घेऊन विल्हेवाट लावणे ही जबाबदारी सरकार, उद्योगजगत आणि समाजाची आहे. Banned Plastic या समस्येचा अभ्यास केल्यावर लक्षात आले की, प्लॅस्टिकचे उत्पादन अथवा त्याचे व्यवस्थापन यापेक्षा त्याचा अनिर्बंध वापर ही खरी समस्या आहे. आज प्रत्येकाने आपल्या रोजच्या वापरामधून प्लॅस्टिकची एक वस्तू रद्दबादल केली तरीदेखील प्लॅस्टिक बंदी यशस्वी होईल.