कुपरेज : मैदानावर आजपासून एफसी बार्यन महाराष्ट्र फुटबॉल कप टुर्नामेंटला सुरुवात झाली आहे. यामध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या 20 मुलांची निवड करण्यात येणार असून त्यांना पुढील ट्रेनिंगसाठी जर्मनीच्या एफसी बार्यन म्युनिच क्लब येथे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे.
मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एफसी बार्यन महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धेच्या लोगोच अनावरण करण्यात आले. आज बुधवारी राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते स्पर्धेच उद्घाटन करण्यात आले. यावेळी एफसी बार्यन म्युनिच क्लब दक्षिण आशियाचे प्रमुख उपस्थित होते. गिरीश महाजन यांनी उपस्थित मुलांशी संवाद साधला व त्यांचा उत्साह वाढवला.
जिल्हा आणि विभाग स्तरावरील स्पर्धेचा शुभारंभ
तसेच जिल्हा आणि विभाग स्तरावरील स्पर्धेचा शुभारंभ झाला. 27 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान पुणे बालेवाडी येथे राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित होणार आहे. राज्याच्या सर्वच जिल्ह्यातून जवळपास 1 लाख मुलं या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.