बीबीसी नावाच्या ‘आँटीची घंटी’ !

 

अग्रलेख

ज्याला कुणाला पीटर जॉर्ज सिसन्स Peter George हे नाव माहिती नसेल, त्याने ते माहिती करून घ्यावे. हा पीटर सिसन्स ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात BBC issue बीबीसीच्या बातम्यांचा प्रमुख सादरकर्ता होता. डाव्या विचारांचा कैवार घेणे हे आमच्या बीबीसीच्या रक्तातच आहे, असे पीटरने २०११ मध्ये सांगितले होते. १९८९ ते २००९ असा वीसेक वर्षांचा काळ बीबीसीत काम केल्यानंतरचे त्याचे हे उद्गार होते. आता दुस-या माणसाबद्दल वाचा. त्याचे नाव आहे रिचर्ड सायमन शार्प Richard Simon Sharp २०२१ सालच्या फेब्रुवारीपासून हा रिचर्ड शार्प BBC issue बीबीसीचा चेअरमन आहे. बीबीसीच्या संस्कृतीत पक्षपातीपणा आहे, हे आम्ही मान्य करतो आणि ती संस्थात्मक समस्या असल्यामुळे आम्ही त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहोत. पीटर आणि रिचर्ड हे दोघेही बीबीसी कुळातले लोक. सुमारे दशकभर ब्रिटनच्या पंतप्रधानपदी राहिलेल्या मार्गारेट थॅचर यांच्यासारख्या मातब्बर महिलेचे मतही बीबीसीबद्दल फार चांगले नव्हते. त्या देखील बीबीसीवर पक्षपाताचा आरोप करायच्या.

BBC issue एका ब्रिटिश नेत्याने बीबीसीला ‘स्टेटलेस पर्सन्स ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ असे संबोधिले होते आणि दुस-याने त्याला थेट ‘बोल्शेविक ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ म्हटले होते. BBC issue हे सारे त्यांच्याच देशात म्हणजे ब्रिटनमध्ये घडलेले. बीबीसी ही काही कायद्याच्या किंवा नैतिकतेच्या दृष्टीने पवित्र गाय नव्हे, हे सांगण्यासाठी ही उदाहरणे. आता मुद्दा भारतातील बीबीसीच्या कार्यालयांमध्ये जाऊन आयकर खात्याने केलेल्या ताज्या तपासणीचा. BBC issue ही धाड नव्हे, तपासणी आहे, असे आयकर खाते म्हणते. आयकर खात्याला कुणाचेही आर्थिक व्यवहार तपासण्याचा अधिकार आहे. सध्या भारतात इंग्रजांचे राज्य नाही. त्यामुळे इंग्रजांच्या अमदानी काळी ईस्ट इंडिया कंपनीला किंवा तत्सम इंग्रज कंपन्यांना होते, तसे राज्यकर्त्यांचे संरक्षण बीबीसीला मिळू शकत नाही. पण, आपल्याच देशातील काही बुद्धिवंतांनी बीबीसीच्या बाजूने कंठशोष सुरू केला आहे आणि तपासणीच्या कारवाईला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील आक्रमण वगैरे नावे देण्यास सुरुवात केली आहे. या आवईला पृष्ठभूमी आहे बीबीसीने अलीकडेच जारी केलेल्या एका माहितीपटाची! ‘इंडिया : दि मोदी क्वेश्चन’ असे या माहितीपटाचे नाव. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मनमानी आरोप करणारा हा माहितीपट! BBC issue  संदर्भ अर्थातच गुजरातमधील दंगली आणि मोदी सरकारची धोरणे वगैरे यांचा. सरकारने त्याच्यावर बंदी आणलेली आहे आणि तरीही लपून-छपून डाव्यांची पिलावळ हा माहितीपट भारतात ठिकठिकाणी दाखवत फिरते आहे.

BBC issue या पृष्ठभूमीवर बीबीसीच्या एखाद्या अधिका-याला आर्थिक व्यवहारांच्या अनुषंगाने मिळालेल्या माहितीबाबत साधी विचारणा करायला कुणी सरकारी अधिकारी गेला असता तरी अशीच आवई उठवली गेली असती. BBC issue कारण बीबीसी हे फार काही तरी महान प्रकरण आहे आणि त्याला महान ठरवल्याशिवाय आपल्या जीवनाचे सार्थक होणार नाही, असे मानणा-यांची संख्या भारतातही कमी नाही. बीबीसीच्या सुमारे शतकभराच्या बातमीदारी आणि रंजनसेवेच्या इतिहासाबद्दल वाद नाही. पण, बीबीसी हे कॉर्पोरेशन त्याच्या स्वतःच्या देशात म्हणजे ब्रिटनमध्ये जर वादाच्या भोव-यात सापडू शकते, त्याच्यावर टीका-टिप्पणी होऊ शकते, BBC issue तर भारतासारख्या स्वतंत्र देशातील सरकारी यंत्रणेने बीबीसीच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी केली तर आभाळ कोसळल्याचा आव आणण्याचे कोणतेही कारण नाही, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. बीबीसीवर करचोरी केल्याचा आरोप आहे आणि अशा आरोपाची चौकशी करण्यात काहीही गैर नाही. BBC issue आता या कारवाईचा संबंध कुणी मोदींच्या विरोधातील माहितीपटाच्या प्रदर्शनाशी लावत असेल तर त्याला कुणाचाही इलाज नाही.

मुळात एक वास्तव समजून घेतले पाहिजे की, मोदींवर किंवा भाजपावर राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय माध्यमांकडून टीका होण्याचा हा पहिला प्रसंग नाही. दुसरे म्हणजे बीबीसी काही पहिल्यांदा वादात सापडलेली नाही. जन्मापासून ही संस्था अनेक वादांमध्ये सापडली आहे. BBC issue अंदाजे तीन दशकांपूर्वी ‘सिक्रेट सोसायटी’ नावाच्या मालिकेमुळे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता दिसत असल्यामुळे पोलिसांनी बीबीसीच्या स्टुडिओवर धाडी घातल्या होत्या. एका कृष्णवर्णीय वृत्तनिवेदिकेला नोकरीतून काढून टाकल्याबद्दल आणि त्या आधीच्या अशाच काही मुद्यांवरून बीबीसीवर वंशवादाचा आरोप झालेला आहे. BBC issue  अगदी दशकभरापूर्वीची अशीच एक घटना सांगितली पाहिजे. बीबीसीने एका कार्यक्रमात बंगळुरूस्थित एका कंपनीकडून (जी जगभरात व्यापार करते) उत्पादनाच्या कार्यात बालमजुरांना कामाला लावले जात असल्याचा आरोप केला. कंपनी अडचणीत आली. मानवाधिकार वगैरेचा कल्लोळ झाला. BBC issue नंतर ती बातमीच पूर्णपणे खोटी असल्याचे सिद्ध झाले आणि बीबीसीने माफी मागितली. बोरिस जॉन्सन ब्रिटनचे पंतप्रधान असतानाची गोष्ट. त्यांच्या एका सल्लागाराने कोरोनाचा कहर सुरू असताना आपल्या पालकांना भेटण्यासाठी प्रवास केला तर त्यावरून बीबीसीने रान उठविले होते. BBC issue त्यावर प्रचंड टीका झाली. ब्रिटनमध्येच! तेव्हाही दिलगिरी वगैरे व्यक्त करण्यात आली.

BBC issue समलैंगिकांच्या संदर्भात बीबीसी पक्षपाती आहे वगैरे आरोप तर नेहमीचेच आहेत. Christopher Booker क्रिस्तोफर बुकर नावाच्या पत्रकाराने बीबीसीच्या भारतासंदर्भातील बातमीदारीपुढे भले मोठे प्रश्नचिन्ह उभे केले होते आणि भारताची प्रतिमा डागाळण्यात बीबीसीचा हात असल्याचा आरोपच केला होता. हा क्रिस्तोफर भारतीय नव्हे तर इंग्रज होता. BBC issue एका इंग्रज प्राध्यापकाने स्वातंत्र्यापासून अलीकडच्या काळापर्यंत बीबीसीने केलेल्या भारतासंबंधीच्या वृत्तसंकलनावर पक्षपाताचा आरोप लावला होता आणि बीबीसी ही वसाहतवादाचे प्रतिनिधित्व करणारी संस्था असल्याचे म्हटले होते. BBC issue अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. या सा-यांतला मुद्दा असा आहे की, बीबीसीच्या भारतातील कारभारात करचोरीचा किंवा आर्थिक गैरव्यवहाराचा संशय असेल तर भारतीय तपास यंत्रणांना त्यासंबंधी चौकशी करण्याचा अधिकार आहे आणि त्यानुसार तपास केला जात आहे. याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संकोचाशी किंवा सेन्सॉरशिपशी कोणताही संबंध नाही. BBC issue पण, आपल्या देशाबद्दल, इथल्या राजकीय नेत्यांबद्दल, इथल्या समाजाबद्दल काहीही बरळण्याचा अधिकार आपल्याला आहे, असे समजून कुणी वावरत असेल तर त्याला रोखले पाहिजे.

बीबीसी ही काही पूर्णपणे स्वायत्त संस्था नाही. BBC issue सम्राटाने किंवा सम्राज्ञीने दिलेल्या सनदेच्या (चार्टर) माध्यमातून बीबीसीची स्थापना झाली होती. बीबीसीचा ब्रिटनच्या सरकारशी समझोता झाला असून मुख्यत्वे तिथल्या टेलिव्हिजन लायसन्स फीच्या माध्यमातून बीबीसीचा खर्च भागविला जातो. BBC issue एका अर्थाने बाहेरूनदेखील रग्गड कमाई बीबीसीला होत असली, तरी त्यांच्या स्वतःच्या देशात त्यांच्या अर्थकारणाला भरीव मदत करणारी व्यवस्था सरकारनेच लावून दिलेली आहे. त्यामुळे बीबीसी ही पूर्णपणे निष्पक्ष, स्वायत्त, निःस्पृह वगैरे संस्था आहे, असे मानण्याला फारसा वाव नाही. बीबीसीला त्यांच्याच देशातल्या काही लोकांनी आँटी बीब Aunty bibअसे नाव दिले आहे आणि या आँटीची घंटी तिच्याच देशात कित्येकदा वाजलेली आहे. प्रत्येकाला नाक मुरडणा-या, प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणा-या आणि प्रत्येकदा ज्ञानाचे डोज पाजणा-या काही काकू आपल्या सर्वांच्या परिचयाच्या असतात. बीबीसी ही अशीच एक काकू म्हणून भूतकाळातच नावारूपाला आली.

BBC issue आतापर्यंत तिचे सगळे लाड सर्वत्र पुरविले जात होते. वाद-विवाद झडले तरी पत्रकारितेची मूल्ये वगैरे पाहून आँटीच्या स्वातंत्र्याचा पुरेपूर आदर करण्याचा प्रयत्न होत असे. या आँटीने आधी स्वातंत्र्याकडून स्वैराचाराकडे आणि आता आर्थिक गैरप्रकारांकडे वाटचाल सुरू केली असेल तर त्याला आपल्या देशातल्या यंत्रणांनी थांबवलेच पाहिजे. BBC issue भारताच्या आयकर खात्याने तेच केलेले आहे. आता कुठे फक्त तपास सुरू केला आहे. काही वेडेवाकडे असेल तर ते नक्की बाहेर येईल. तशातले काहीच नसेल तर कुणीच काळजी करण्याचे कारण नाही. BBC issue त्यामुळे अशा या आँटीची घंटी वाजविल्याबद्दल ज्यांना सध्या अतीव दुःख झाले असेल त्यांनी थोडा प्रयत्न आणखी करावा आणि बीबीसीसारख्या वसाहतवादी पृष्ठभूमीच्या संस्थांबद्दल अश्रू वाया घालवणे बंद करावे म्हणजे ते शिल्लक ठेवावेत. BBC issue ही घंटी कदाचित ट्रेलरचीच असेल…, अख्ख्या सिनेमाची नसेल… कुणी सांगावे!