हेअर कलर करताना ही काळजी घ्या, अन्यथा..

तरुण भारत लाईव्ह ।०२ फेब्रुवारी २०२३। आजकाल केसांना कलर करण्याचा खूप ट्रेंड आहे. वेगवेगळ्या शेड्स देऊन केसांना लुक देता येतो. बाजारात अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. पण त्यात भरपूर केमिकल्स असतात. परिणामी केसं खराब होऊन  मुळापासून कमकुवत होऊन गळू लागतात. या धोक्यापासून बचाव करण्यासाठी काही टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करू शकतात.

केसांना कोणताही रासायनिक रंग लावण्यापूर्वी संपूर्ण स्काल्पला पेट्रोलिअम बेस लावा. यामुळे तुमच्या स्काल्पमध्ये केमिकल शोषले जाण्याचा धोका कमी होईल. केस डाय केल्यानंतर स्काल्प स्वच्छ धुतले जाईल याची काळजी घ्यावी. तुमच्या केसांसाठी पहिल्यांदाच केमिकल डाय वापरत असाल तर केसांच्या छोट्या भागावर पहिले त्याची चाचणी करा. डाय लावल्यावर जर तुम्हाला खाज सुटणे, डोळ्यांची जळजळ होणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, अशा समस्या उद्भवली तर हेअर डाय किंवा हेअर कलर बिलकूल वापरू नका.

रासायनिक रंगांमुळे केस हे निस्तेज, कोरडे आणि रफ बनवू शकतात. म्हणूनच केसांना रंग देण्यापूर्वी खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईल लावावे. आठवड्यातून एक किंवा दोनदा केसांना मॉयश्चरायझ करणे महत्त्वाचे आहे. केसांना मॉयश्चरायझ केल्याने केस मऊ होतात. तसेच केस गळणे सुद्धा कमी होते.