घरी नक्की ट्राय करा; कॉर्न-ब्रेड रोल

तरुण भारत लाईव्ह ।०८ फेब्रुवारी २०२३। मका भाजून खायला सगळ्यांनाच आवडतो. काही जणांना मक्याचे उकडलेले दाणे आवडतात तर काही जणांना मका भाजून खायला आवडत. मक्याचा एक वेगळा पदार्थ तुम्ही ट्राय करू शकता. कॉर्न-ब्रेड रोल हा घरी करायला अतिशय सोप्पा आहे. हा पदार्थ घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य 
मक्याच्या दाण्यांचा कीस 2 वाट्या, हिरवी मिरची, लसूण, आले, जिरे, शोप, हळद, लाल मिरची, मीठ, कोथिंबीर, तेल, ब्रेड.

कृती

सर्वप्रथम आले-लसूण, हिरवी मिरची मिक्सरमध्ये वाटून घ्या. एक चमचा तेल गरम करा. त्यात जिरे, शोप टाका. त्यात मक्याचा कीस, लाल मिरची, हळद आणि मीठ टाका. थोडे भाजून घ्या. हिरवी मिरची आणि आल्याचा तयार केलेला मसाला टाका. कोथिंबीर टाका. गार झाल्यावर दीड इंचाएवढे लांब रोल बनवा.
ब्रेडचे काठ कापून नंतर  ब्रेड पाण्यात भिजवून पानी काढून टाका. तयार केलेला रोल ब्रेडमध्ये भरा. हा रोल दोन तास फ्रीजमध्ये ठेवा. नंतर गरम तेलात गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्या. गरम गरम ब्रेड-मका रोल सर्व्ह करा.