तरुण भारत लाईव्ह । जळगाव : शहरातील महाबळ परिसरातील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहाजवळील रस्त्यावर एका प्रौढाचा चोरटयांनी मोबाईल लांबविल्याची घटना गुरूवारी दु ४.१५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून याप्रकरणी दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे.
जळगाव शहरातील इंद्रनिल सोसायटी येथे नितीन रमेश सोनवणे हे वास्तव्यास आहेत. ते गुरुवारी दुपारी ४.१५ वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह परिसरात आले होते. दरम्यान दोन युवकांनी त्यांना मारहाण करून त्यांच्याजवळील १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून तेथून पळ काढला.
नितीन सोनवणे यांनी लागलीच रामानंदनगर पोलिस स्थानक गाठून संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. सोनवणे यांच्या तक्रारीवरून त्या दोन्ही युवकांविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गोपाल देशमुख हे करीत आहेत.