Beed Lok sabha election result : बीडमधून पंकजा मुंडे यांचा पराभव, बजरंग सोनवणे विजयी

Beed Lok sabha election result : बीड लोकसभा निवडणूक निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या निकालाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा थोडक्यात पराभव झाला असून, शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा विजय झाला आहे.

या निवडणुकीत राज्यासह देशाच लक्ष बीड मतदारसंघाकडे होते त्याच कारण म्हणजे मुंडे भाऊ बहिण एकत्र. बीड लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. कारण 2004 वगळता गेल्या आठ निवडणुकांमध्ये या ठिकाणी भाजपने सत्ता मिळवली होती. 2019 मध्ये प्रीतम मुंडे यांना भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली होती. पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला आणि पुन्हा एकदा प्रीतम मुंडे खासदार झाल्या.

2014 च्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांना जवळपास 7 लाखांची आघाडी होती. पण 2019 मध्ये 1 लाख 68 हजारांची आघाडी मिळाल्याचं चित्र होतं. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. मात्र, भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा थोडक्यात पराभव झाला असून, शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा विजय झाला आहे.