---Advertisement---

अख्ख शहर हादरलं! क्षुल्लक कारणावरून घातला पत्नीच्या डोक्यात दगड

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । २१ मार्च २०२३। बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शुल्लक कारणावरून नवरा-बायकोमध्ये वाद झाला. या वादाच्या रागातून नवऱ्याने आपल्या बायकोच्या डोक्यात धुणी धुण्याचा दगड घालून तिला संपवल्याची घटना घडली आहे. सविता सुरेश उर्फ चिंतेश्वर राठोड (वय वर्ष ३८) असं मृत झालेल्या महिलेचं नाव आहे. याप्रकरणी आरोपीपतीवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सूत्रानुसार, तीन दिवस लग्न समारंभ आटोपल्यानंतर बायकोने नवऱ्याला आपण उचललेली जी उचल आहे ते तुम्ही का खर्चून टाकली, अशी विचारणा केली. त्यामुळे दोघांत वाद निर्माण झाला आणि या वादाचं रुपांतर सततच्या कुरुकुरेत झालं. याला कंटाळून आणि रागाच्या भरात आरोपी चिंतेश्वर राठोड यांनी चक्क त्यांच्या पत्नीच्या डोक्यात धुणी धुण्याचा दगडच टाकला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. या घटनेनंतर तात्काळ त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. सविता सुरेश उर्फ चिंतेश्वर राठोड (वय वर्ष ३८) असं मृत झालेल्या महिलेचं नाव आहे.

यामध्ये नातेवाईकांनी पती, दीर आणि पुतण्या या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला होता. यामध्ये काही काळासाठी शवविच्छेदन देखील रोखण्यात आलं होतं. मात्र, पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करत या तीन व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आणि मृत महिलेवर शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी त्यांच्या गावी पाठवण्यात आला. या घटनेमुळे गेवराई तालुक्यासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment