बिअर प्रेमींनो.. तुमच्यासाठी खुशखबर, काय आहे?

Beer : बिअर प्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे, आता तुम्हाला सहज घरच्या घरी अवघ्या दोन मिनिटांमध्ये बिअर (Beer)  करून पिता येणार आहे. बिअर प्रेमींना जर्मनीतील एका कंपनीने ही खुशखबर दिला आहे. नेमकी काय खुशखबर आहे चला जाणून घेऊयात.  

जर्मनीतील एका कंपनीने आता बिअर पावडर तयार केली आहे.  या बिअर पावडरचा वापर करुन तुम्ही सहज घरच्या घरी अवघ्या दोन मिनिटांमध्ये थंडगार बिअर तयार करु शकता. हे ऐकून खोटं वाटत असले तरी हे खरं आहे. जर्मनीतील एका कंपनीने ही बिअर पावडर बनवली आहे. अशा प्रकारचा हा पहिला शोध असून ही जगातील पहिली बिअर पावडर आहे. याआधी कधीही पावडर स्वरूपात बिअर बनवली गेली नव्हती.

तुम्ही फक्त दोन चमचे पावडर थंड पाण्यात मिसळा आणि तुमची थंडगार बिअर तयार आहे. यासोबतच हे पर्यावरणासाठीही खूप फायदेशीर आहे, कारण पावडर बिअर बनवताना जास्त कार्बन उत्सर्जन होत नाही.

जर्मनच्या एका न्यूज वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्याबातमीनुसार, पूर्व जर्मनीमध्ये ही बिअर पावडर बनवण्यात आली असून ही बिअर पावडर हा अशा प्रकारचा पहिला शोध आहे. या आधी कुणीही पावडर स्वरूपात बिअर बनवली नव्हती. पूर्व जर्मनीमधील नोएटसेल ब्रुअरी कंपनीने ही बिअर पावडर तयार केली आहे. ही बिअर पावडर बनवणाऱ्या नोएटसेल ब्रुअरीने सांगितले की, या वर्षाच्या अखेरीस ही बिअर पावडर बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.