तरुण भारत लाईव्ह ।११ फेब्रुवारी २०२३। अमरावती मधून एक घटना समोर येतेय अमरावतीत एका एकतर्फी प्रेम प्रकरणात एक मजनू थेट प्रेयसीच्या होणाऱ्या सासरी पोहोचला. प्रेयसीच्या सासरच्यांना त्याने धमकावले असल्याची सूत्रानुसार, माहिती मिळतेय. अखेर या मजूनच्या एकतर्फी प्रेमाचा मार्ग थेट पोलिस ठाण्यात पोहोचला.
सूत्रानुसार, अमरावतीत एका एकतर्फी प्रेम प्रकरणात एक मजनू थेट प्रेयसीच्या च्या होणाऱ्या सासरी पोहोचला. लग्न करून तुम्ही तिला सून म्हणून घरात आणाल, तर मी जिवाचे बरेवाईट करेन, अशी धमकीच आरोपीने थेट तरुणीच्या होणाऱ्या सासूबाईंना दिल्याने घरचे चांगलेच हादरले आहेत. एका दिवशी ही बाब तरुणीच्या लक्षात आली. सामाजिक बदनामी टाळण्यासाठी तिने त्याला पाठलाग का करतोस? अशी विचारणा केली. त्यावर माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तूच हवी आहेस, मला तुझ्याशीच लग्न करायचे आहे, असा तो बडबडला. त्यावर तिने त्याला ठामपणे नकार दिला. मात्र तिची भूमिका समजून न घेता त्याने एकतर्फी प्रेमातून त्याचे पोरकट चाळे सुरूच ठेवले.
तरुणीचे लग्न जुळल्याची बाब विशालला माहिती झाली. त्यामुळे तो एका रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास तरुणीच्या सासरी पोहोचला आणि त्याने अक्षरशः गोंधळ घातला. तिचे लग्न झाले आहे, तिला सून म्हणून तुम्ही घरी आणले, तर त्या क्षणी मी आत्महत्या करेन, अशी धमकी त्याने दिल्याने तिच्या सासरची मंडळी चांगलीच हादरली होती.
ही घटना तरुणीच्या होणाऱ्या सासूने तरुणीला फोन करून सांगितली. त्या घटनेने दोन्ही कुटुंबीय डिस्टर्ब झाले आहेत. अखेर तरुणीनेच पोलिस ठाणे गाठत त्याच्या विरुद्ध तक्रार केल्याने पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.