जाणून घ्या; पुदिना लिंबू पाणी पिण्याचे फायदे

तरुण भारत लाईव्ह । १७ एप्रिल २०२३।  लिंबूमध्ये मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि फोलेट सारखे पोषक घटक आढळतात.तसेच, पुदिना आणि लिंबू बहुतेक वेळा सर्व ऋतूंमध्ये सेवन केले जाऊ शकते. पण उन्हाळ्यात पुदिना आणि लिंबू सेवन करणे खूप फायदेशीर आहे. कारण पुदिना आणि लिंबाचा थंड प्रभाव असतो. अशा परिस्थितीत पुदिना आणि लिंबू सेवन केल्यास शरीरात थंडावा कायम राहतो. उन्हाळ्यात पुदिना लिंबू पाणी पिण्याचे फायदे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

उन्हाळ्यात शरीरात निर्जलीकरण सुरू होते. यामुळे व्यक्तीला थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. पण उन्हाळ्यात दररोज पुदिना आणि लिंबाचा रस प्यायल्यास शरीर हायड्रेट राहते. पुदिना आणि लिंबू पाणी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हाळ्यात पोटात उष्णता असते. पुदिन्याचा प्रभाव खूप थंडावा देणारा आहे. अशा परिस्थितीत पुदिना आणि लिंबू पाणी नियमित सेवन केल्यास शरीर थंड राहते.
उन्हाळ्यात बहुतेकांना अॅसिडिटीचा त्रास सुरू होतो. त्यामुळे त्यांच्या पोटात आणि छातीत जळजळ होऊ लागते. अशा परिस्थितीत पुदिना आणि लिंबू पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. पुदिना आणि लिंबू पाणी रोज प्यायल्यास उष्माघात टाळता येईल. उष्णतेपासून वाचण्यासाठी दररोज पुदिना आणि लिंबू पाणी पिऊन घराबाहेर पडा.