जळगाव जिल्ह्यातील १० लाख लाडक्या बहिणींना लाभ

---Advertisement---

 

जळगाव : गत वर्षी सप्टेंबर २०२४ पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत बहिणींना महिना दीड हजार रुपयांचा लाभदेण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या निर्णयानंतर जिल्ह्यात त्याला चांगला प्रतिसाद मिळून १० लाखांहून अधिक लाडक्या बहिणीनी ऑनलाईन, मोबाईल अॅप तसेच स्थानिक स्तरावर नोंदणी केली व लाभ घेतला.

दरम्यान बहिणीच्या नावावर पुरूषांनी तसेच शासकिय कर्मचारी महिलांसह बनावट लाभार्थ्यांनी या योजनेत सहभागी होत लाभघेतल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार राज्य शासनस्तरावरून ग्रामीण पातळीवर अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेतला जाऊन लाभार्थी पडताळणी मोहिम राबविली जात आहे.



मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत जिल्ह्यातील ११ लाखांहून अधिक महिला लाभार्थींपैकी शासकीय नोकरी, चारचाकी वाहन, कुटुंबांत दोनपेक्षा जास्त लाभार्थी, २१ वषपिक्षा कमी आणि ६५ पेक्षा अधिक अशा वयोगटातील लाभार्थी अशा कारणांमुळे शासन निर्देशानुसार ७५ हजार ६९५ लाडक्या बहिणींचे लाभ अपात्रतेमुळे सद्यस्थितीत बंद आहेत.

यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी महिन्याला येणारे ११ कोटी २५ लाख रुपये निधी बंद झाला आहे. यातील अपात्र अशा तब्बल ९२ हजाराहून अधिक लाभार्थ्यांची जिल्हा परिषद प्रशासनांतर्गत स्थानिक स्तरावरून अंगणवाडी सेविका, सहायकांकडून
पडताळणी केली जात आहे. यात निकषानुसार पात्र असतील अशा लाभार्थीना बंद करण्यात आला आहे. लाभ दिला जाईल. अन्यथा या अपात्र लाडक्या बहिणींचे लाभ रद्द होणार आहेत. जिल्ह्यात पहिल्या टप्यात ९० हजाराहून अधिक लाडक्या बहिणी योजनेस आरोप झाल्यानंतर शासनाने अशा लाडक्या बहिणी अपात्र ठरविण्यात आल्या होत्या. त्यानंतर शासकीय नोकरीत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा लाभ शासनस्तरावरुनच बंद करण्यात आला आहे.

---Advertisement---

 



यानंतरच्या तिसऱ्या टप्प्यात ७५ हजार ६९५ महिला एकाच कुटुंबात शिधापत्रिकेनुसार दोनपेक्षा अधिक महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ७५ लाख ६९५ लाडक्या बहिणींची प्रत्यक्ष त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत पडताळणी केली जात आहे. यात अंगणवाडी सेविकांना स्थानिक स्तरावर अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने ६० ते ७५ टक्के काम झाले असून पडताळणी संथगतीने होत असल्याचे दिसून आले आहे.

जिल्हा महिला बाल कल्याण, अधिकारी आर. आर. तडवी यांनी सांगितले आहे की, जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सुमारे ११ लाखांहून अधिक महिला लाभार्थीची नोंदणी झालेली आहे. यात ९२ हजार ८६० लाभार्थीची यादी पडताळणी करण्याचे निर्देश शासनस्तरावरून आले आहेत. यानुसार संबंधीत प्रशासनाकडे लाभार्थी यादी पाठविण्यात आली असून पडताळणीअंती सर्व माहिती शासनाकडे पाठविली जाईल.

जिल्हा परिषद महिला बाल कल्याण विभाग, उपमुख्य कार्यकारी हेमंतराव भदाणे म्हणाले की, शासनाकडून ९२ हजार ८६० महिलांची यादी पडताळणीसाठी आलेली आहे. या यादीनुसार ७५ हजार ६९५ लाभार्थी एकाच कुटुंबात शिधापत्रिकेत दोनपेक्षा अधिक महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ७५ लाख ६९५ लाडक्या बहिणींची प्रत्यक्ष त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत पडताळणी केली जात आहे. यात अंगणवाडी सेविकांना स्थानिक स्तरावर अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने ६० ते ७५ टक्के काम झाले असून पडताळणी संथगतीने होत असल्याचे दिसून आले आहे.


Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---