सावधान… आता विकता येणार नाहीत तुमच्या कडील जुने दागिने !

तरुण भारत लाईव्ह न्युज | जळगाव : सरकारने दागिन्यांची विक्रीसाठी आता नवीन नियम लागू केले आहेत . घरात ठेवलेले जुने दागिने हॉलमार्क केल्याशिवाय तुम्ही विकू शकणार नाहीत. सरकारने हॉलमार्किंग गोल्ड, सोने खरेदी-विक्रीसाठी नवीन नियम जारी केले आहेत.

या नियांनुसार आता घरांमध्ये ठेवलेल्या जुन्या सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंगही बंधनकारक करण्यात आले आहे . नवीन नियमांमध्ये  सर्व सोन्याचे दागिने आणि कलाकृतींवर हॉलमार्क यूनिक आयडेंटीटिफिकेशन नंबर असणे गरजेचे आहे. याआधी म्हटले जात होते की, हॉलमार्किंग बाबत  नव्या दागिन्यांच्या खरेदीसाठी लागू होईल. मात्र, आता असे होणार नाही. सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आता जुन्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. ज्या ग्राहकांकडे हॉलमार्क नसलेले सोन्याचे दागिने आहेत त्यांनी ते विकण्यापूर्वी किंवा नवीन डिझाईनसाठी देवाणघेवाण करण्यापूर्वी हॉलमार्क करणे अनिवार्य असेल. वापरलेल्या दागिन्यांना हॉलमार्क करून घेण्यासाठी ग्राहकांकडे दोन पर्याय असतील. बीआयएस नोंदणीकृत ज्वेलर्सकडून हॉलमार्क न केलेल्या जुन्या दागिन्यांना हॉलमार्क करून घेऊ शकता.

नोंदणीकृत ज्वेलर्स हॉलमार्क न केलेले सोन्याचे दागिने हॉलमार्किंग सेंटर येथे घेऊन जातील.ग्राहकांसाठी दुसरा ऑप्शन म्हणजे कोणत्याही बीआयएस- मान्यताप्राप्त हॉलमार्किंग केंद्रांवर दागिन्यांची चाचणी करून हॉलमार्क करून घेणे.दागिन्यांची संख्या ५ किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास हॉलमार्किंगसाठी, ग्राहकाला प्रत्येक दागिन्यासाठी ४५ रुपये द्यावे लागतील. चार पीस हॉलमार्क करण्यासाठी २०० रुपये द्यावे लागतील. बीआयएसद्वारे मान्यताप्राप्त हॉलमार्किंग केंद्र दागिन्यांची तपासणी करेल आणि त्याचे सर्टिफिकेट देईल. ग्राहक आपले हॉलमार्क नसलेले सोन्याचे दागिने विकण्यासाठी हा रिपोर्ट घेऊन कोणत्याही सोनाराकडे जाऊ शकतो.