नंदुरबार : तालुक्यातील भालेर येथे उसनवार दिलेल्या पैशांच्या वादातून झालेल्या मारहाणीत चौघांना दुखापत झाली. या प्रकरणी परस्पर फिर्याद दाखल करण्यात आली असून सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
उसनवारीच्या पैशातून हाणामारी
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील राकेश गेंधल पाटील यांनी धनंजय कैलास पाटील याच्याकडे दिलेले ऊसनवार पैसे मागितले. याचा राग आल्याने राकेश पाटील यांना धनंजय कैलास पाटील, विनोद बारकू पाटील, विनोद बारकू पाटील यांचा मुलगा व अरविंद बारकू पाटील यांनी शिविगाळ करुन हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच हेमंत कलास पाटील याने जीवेठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी टॉमी डोक्यावर मारुन दुखापत केली. याबाबत राकेश पाटील यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात भादंवि कलम 307, 323, 143, 147, 148, 149, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी करीत आहेत.
दुसर्या गटानेही दिली तक्रार
दुसर्या गटातर्फे धनंजय कैलास पाटील यांनी फिर्याद दिली. धनंजय पाटील यांच्याकडे मुकेश गेंधल पाटील याने दिलेले उसनवार पैसे मागितले. याचा कारणावरुन धनंजय पाटील, हेमंत कैलास पाटील, विनोद बारकू पाटील यांना मुकेश गेंधल पाटील, राकेश गेंधल पाटील यांनी लोखंडी रॉड डोक्यावर मारुन दुखापत केली. तसेच हाताबुक्यांनी मारहाण व शिवीगाळ करुन जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत धनंजय पाटील यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भादंवि कलम 324, 323, 427, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नाईक एकनाथ ठाकरे करीत आहेत.