राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : अभियांत्रिकी व तंत्रज्ञान उपकार्यबल गटाच्या सदस्यपदी भरतदादा अमळकर

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाने देशात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू केले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रात सूकाणू समिती अंतर्गत ११ तज्ज्ञांची अभियांत्रिकी व तंत्रज्ञान उपकार्यबल गट गठीत करण्यात आला आहे. या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान उपकार्यबल गटात जळगाव येथील केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे प्रमुख, शिक्षण क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती तसेच प्रतिथयश उद्योजक भरतदादा अमळकर यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

उपकार्यबल गटातील सदस्य

  1. डॉ. आर. डी. कुलकर्णी, कुलगुरु, मुंबई विद्यापीठ, मुंबई – अध्यक्ष
  2. प्रा. विलास सपकाळ, कुलगुरु, एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर – सदस्य
  3. प्रा. फारुक काझी, विभागप्रमुख, व्हीजेटीआय, मुंबई – सदस्य
  4. प्रा. संजय नलबलवार, प्राध्यापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे रायगड – सदस्य
  5. प्रा. श्रीरंग जोशी, विभागप्रमुख, फार्मासिटीकल्स सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी, आयसीटी, मुंबई – सदस्य
  6. प्रा.वाय.व्ही जोशी, प्राध्यापक एस. जी.जी.एस अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था, नांदेड – सदस्य
  7. प्रा. सचिन उंटवाले, संचालक, रायसोनी इन्स्टिटयुट, नागपूर – सदस्य
  8. डॉ. बी. एन. चौधरी, प्राचार्य, एसपीआयटी, मुंबई – सदस्य
  9. भरत अमळकर, उद्योजक, जळगाव – सदस्य
  10. महेश दाबक, उद्योजक, नाशिक – सदस्य
  11. डॉ. विनोद मोहितकर, संचालक, तंत्र शिक्षण, मुंबई – सदस्य सचिव

काय असेल या उपकार्यबल गटाची कार्यकक्षा

  • उपकार्यबल गटाने आवश्यकतेनुसार बैठका घेऊन स्वायत्त अभियांत्रिकी संस्थांना संदर्भिय शासन निर्णयामधील तरतूदीच्या अनुषंगाने मार्गदर्शन ( Mentoring) करावे.
  • उपकार्यबल गटाने तरतूदी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सर्व अभियांत्रिकी /तंत्रज्ञान संस्थांना लागू करण्याच्या अनुषंगाने संबंधित विद्यापीठांना मार्गदर्शन करावे आणि अनुषंगिक बाबींची पुर्तता करावी.
  • शासकीय/अनुदानित/विनाअनुदानित स्वायत्त संस्थांकडून वेळोवेळी अहवाल मागवून तो सुकाणू समितीस सादर करावा.