---Advertisement---

आपला दवाखाना घोटाळा प्रकरण : भारत एकता मिशनतर्फे फैजपूर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन, केली SIT चौकशीची मागणी

---Advertisement---

---Advertisement---

यावल प्रतिनिधी
यावल :
जळगाव जिल्ह्यातील ”हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि वर्धनी केंद्र शहरी आरोग्य योजना” यामध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आज भारत एकता मिशनतर्फे फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करून एस.आय.टी. (विशेष तपास पथक) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

भीम आर्मीच्या प्रतिनिधींनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, १५व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून प्राप्त झालेला निधी जनतेच्या आरोग्यासाठी वापरण्याऐवजी अपहार करण्यात आला असून, यामागे डॉ. भायेकर यांची भूमिका संशयास्पद आहे. दि. १५ जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेतही या घोटाळ्याचा सविस्तर तपशील उघड करण्यात आला होता. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

१४ ऑगस्टपर्यंत कारवाई झाली नाही, तर १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत तीव्र आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही निवेदनात म्हटले आहे.

या प्रसंगी भीम आर्मीचे रावेर तालुका अध्यक्ष राहुल निंभोरे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख राहुल जयकर, तालुका उपाध्यक्ष जुम्मा तडवी, जिल्हा संघटक हेमराज तायडे, संतोष तायडे, अविनाश लहासे व मुकद्दर तडवी, मोसिम तडवी आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment