Bharat Gavit । आदिवासी साखर कारखान्याचे अध्यक्ष भरत गावित यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करताच, नवापुरातील अजित पवार पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांनी राजीनामा नाट्य सुरू केले आहे. पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी मात्र राजीनामा देणाऱ्यांवरच आरोप करीत राजीनामे स्वीकारले आहेत.
अजित पवार गटात प्रवेश केला अन् नवापूर मतदारसंघातून उमेदवारीसाठी पक्षाचा एबी फॉर्मही मिळविला. मुंबईत या घडामोडी घडत असताना स्थानिक स्तरावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तालुक्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेत राजीनामे दिल्याचे जाहीर केले. यावेळी आपल्याला विश्वासात न घेता हा प्रवेश दिला गेल्याचा त्यांनी आरोप केला.
ज्या कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत त्यांचे राजीनामे आपण स्वीकार करतो. मात्र संबंधित कार्यकर्त्यांनी राजीनामा देताना जे आरोप केले त्यावर त्यांनीच चिंतन करण्याची गरज आहे. त्यांची सोयरिक कुठल्या पक्षाशी होती हे सर्वांना माहिती आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे म्हणाले.
यांनी दिले राजीनामे
गावित यांना विधानसभेची उमेदवारी दिल्यानंतर नाराज कार्यकर्त्यांकडून पक्षाचा राजीनामा देण्यात आला आहे. यामध्ये अनेक सरपंच आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याने भरत गावित यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तसेच याचा परिणाम विधानसभेत निवडणुकीवर होणार का ? असा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे.