Bharat Jodo Yatra : तळोदा
कांग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्च रोजी नंदुरबारात दाखल होणार असून, या यात्रेला नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी न्याय यात्रा म्हणुन संबोधले जाणार आहे. नंदुरबारत होणाऱ्या कार्यक्रमात पक्षाचा ध्वज गुजरात काँग्रेस कमिटी कडून महाराष्ट्र काँग्रेस कमिटीकडे सोपविला जाणार आहे.
यावेळी खासदार राहुल गांधी हे उपस्थित जन समुदायाला संबोधणार असल्याची माहिती, आमदार अँड. के. सी. पाडवी यांनी दिली भारत जोडो न्याय यात्रेच्या नियोजनाबाबत माहिती देण्यासाठी आमदार अँड.के.सी.पाडवी यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी पक्षाचे प्रभारी जिल्हाध्यक्ष शिरीष कुमार नाईक, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संदीपनाथ जि. प. उपाध्यक्ष सुहास नाईक, दिलीप नाईक, पंडितराव पवार, उपस्थित होते. आमदार पाडवी यांनी अधिक माहिती देताना सांगितले, भारत जोडो न्याय यात्रा १० मार्च रोजी गुजरात मधील सोनगड येथे येणार आहे. १२ मार्च रोजी यात्रा नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. नवापूर मार्गे यात्रा थेट नंदुरबार दाखल होईल.
खासदार राहुल गांधी हे दिल्लीहून विमानाने सुरत येथे येतील. तेथून ते हेलिकॉप्टरने थेट नंदुरबारात दाखल होतील. पोलीस अधीक्षक कार्यालयातील कवायत मैदानावरुन ते वळण रस्त्याने सीबी ग्राउंडवर येती तिथे आयोजित कार्यक्रमात यात्रेदरम्यानचा पक्ष ध्वज गुजरात काँग्रेस कमिटी कडून महाराष्ट्र काँग्रेस कमिटी कडे सोपविला जाणार आहे.
यानिमित्त खासदार राहुल गांधी जनतेला संबोधित करतील. त्यानंतर यात्रा दोंडाईचाकडे प्रस्थान करेल. दोंडाईचा, धुळे, मालेगाव, नाशिक मार्गे मुंबईला पोहचणार असून तेथे यात्रेचा समारोह येईल. असे सांगितले काँग्रेस पक्षाने नेहमीच आदिवासींना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे समाज नेहमी काँग्रेसच्या पाठीशी उभा आहे. परंतु मोदी सरकारने आदिवासी विरोधात कायदे करून त्यांना न्याय हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील ही यात्रा आल्यावर तिला आदिवासी न्याय यात्रा म्हणुन संबोधणार असल्याचे आमदार अँड के.सी. पाडवी यांनी सांगितले भारत जोडो न्याय यात्रा दरम्यान नंदुरबारातील कार्यक्रमासाठी प्रियंका गांधी यांना आणण्याचा आग्रह आहे. याशिवाय पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनिथला, आर.सी. वेणुगोपाल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते माजी आमदार बाळासाहेब थोरात आधी सह विविध नेते उपस्थित राहणार आहे.