अग्रलेख
Natu natu song oscar भारतासाठी ९५ वी ऑस्करवारी फलदायी ठरली. यंदाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात भारताने इतिहास घडवला. तब्बल २१ वर्षांनंतर ९५ व्या अॅकॅडमी पुरस्कारांमध्ये भारताची मान पुन्हा एकदा उंचावली.
या सोहळ्यात सोमवारी ‘अँड ऑस्कर गोज टू’ ही घोषणा होत असताना समस्त भारतीयांची छाती दोनदा अभिमानाने फुलून गेली. natu natu song oscar कारणही तसेच होते आणि विषयही महत्त्वाचे होते. ‘नाटू नाटू’ या गाण्याचे संगीतकार एम. एम. किरवानी ऊर्फ क्रिम व गीतकार चंद्राबोस आणि ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या लघु माहितीपटाच्या कार्तिकी गोन्साल्विस व गुनीत मोंगा यांनी ऑस्करची बाहुली जिंकली. ‘नाटू नाटू’ या गाण्याने बेस्ट ओरिजिनल साँग या श्रेणीत ऑस्कर पटकावला. natu natu song oscar याशिवायही भारतासाठी आणखी एक बाब आनंदाची ठरली. बॉलिवूडची ‘मस्तानी’, ‘डिंपल गर्ल’ अर्थात दीपिका पदुकोणचा ऑस्कर प्रेझेंटरच्या यादीत समावेश झाला होता. तिची उपस्थिती लक्षवेधी ठरली. natu natu song oscar तिने ‘नाटू नाटू’ गाण्याची पृष्ठभूमी सर्वांसमोर मांडली आणि त्यानंतर प्रत्यक्ष या गाण्याच्या सादरीकरणाने ऑस्करमध्ये दुग्धशर्करा योग साधला गेला.
natu natu song oscar एका आंतरराष्ट्रीय मंचावर भारताची दखल घेतली जाणे म्हणजे भारतीय चित्रपट, भारतीय संगीत, भारतीय कोरिओग्राफी, भारतीय चित्रीकरण स्थळे वेगवेगळ्या देशांमध्ये पोहोचणार आहेत. त्याचे आर्थिक परिणामही येत्या काळात भारतीय चित्रपटसृष्टीत बघायला मिळणार आहेत. चित्रपटांसाठी आर्थिक वातावरणही महत्त्वाचेच आहे; ते नसेल तर कितीही चांगले कथानक असले, तरी चित्रपट आपटल्याची अनेक उदाहरणे आहेत. natu natu song oscar कोणता चित्रपट लोकप्रियतेचा उच्चांक गाठेल आणि कोणत्या चित्रपटाला मायबाप प्रेक्षक डोक्यावर घेतील, याचे काही समीकरण नाही. प्रत्येक चित्रपट तयार करताना दिग्दर्शक आपापल्या परीने त्यात जान ओततो.natu natu song oscar चित्रपटाच्या कथानकापासून झालेली सुरुवात कलाकारांची निवड, चित्रीकरण स्थळे, उपयोगात आणावयाचे कॅमेरे, छायाचित्रण, कोरिओग्राफी, मिक्सिंग, गाण्यांची निवड, चित्रपट तयार झाल्यानंतर त्याचे वितरण आणि सरतेशेवटी प्रेक्षकांचा प्रतिसाद येथे संपतो. natu natu song oscar कुठल्याही निर्मात्याने कितीही चांगल्या दर्जाचा आणि कितीही पैसा लावून चित्रपट निर्मिती केली आणि प्रेक्षकांची दादच मिळाली नाही तर निर्मितीमागचे सारेच प्रयत्न व्यर्थ जातात. natu natu song oscar पण ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या लघु माहितीपटाने सा-या समीकरणांना छेद देत यंदा ऑस्करवर आपली मुद्रा कोरली.
natu natu song oscar नाटू नाटूचे कौतुक सुरू असताना या चित्रपटाच्या भावगर्भ कथानकावर उमटलेली आंतरराष्ट्रीय मोहर कायम ध्यानात ठेवावी अशीच आहे. तामिळनाडूतील जंगलात राहणा-या बोम्मन आणि बेली नावाने वनवासी जोडपे रानटी हत्तींचा प्रतिपाळ कसे आईबापाच्या भूमिकेतून करते, त्यांची सत्यकथा टिपणारा हा लघुपट आहे. मनुष्य आणि वन्यजीव यांच्यातील संबंध या चित्रपटाच्या माध्यमातून ४१ मिनिटात उलगडतो. natu natu song oscar तामिळनाडूतील मदुमलाई राष्ट्रीय उद्यानात या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. हत्तीच्या ‘रघू’ नामक पिलाचा सांभाळ बोम्मन आणि बेली कसे करतात, याची ही कथा आहे. हा माहितीपट नेटफ्लिक्सवर डिसेंबर २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या निर्मात्या गुनीत मोंगा या ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ आणि ‘समान’ यासारख्या चित्रपटांच्या निर्मितीत सहभागी होत्या. natu natu song oscar त्याचप्रमाणे दिग्दर्शिका कार्तिकी गोन्साल्विस हिने अॅनिमल प्लॅनेट आणि डिस्कव्हरी या वाहिन्यांसाठी छायाचित्रण केले आहे. जागतिक पातळीवर भारतीय मोहोर उमटविण्याचा सुरू झालेला हा सिलसिला यापुढेही सुरू राहायला हवा.
‘नाटू नाटू’ या गाण्याने भारतातही राष्ट्रीय पुरस्कार पटकावले होते. natu natu song oscar त्यामुळे या गाण्याकडून ऑस्करमध्येही उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा केली जात होती. अपेक्षेनुरूप या गाण्यावरही आंतरराष्ट्रीय मुद्रा उमटली आहे. ‘आरआरआर’ हा चित्रपट काही अभिनयासाठी अथवा आशयासाठी लक्षात राहण्यासारखा नाही. भव्यता आणि तांत्रिक करामती यासाठीच त्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. पण असे गुण घेऊन आलेल्या कितीशा चित्रपटांवर ऑस्करची मोहोर उमटली आहे? natu natu song oscar काही चित्रपटांचे यश आकलनापलीकडचे असते तसेच या चित्रपटाच्या यशाबद्दल बोलले गेले. असे असले, तरी या चित्रपटातील गाणे सुपरडुपर हीट झाले. सिनेतारका दीपिका पदुकोणने पाहुल सिप्लिगुंज आणि कालभैरवा या दोन गायकांची ओळख करून दिल्यानंतर नाटू नाटूच्या नर्तकवृंदाने प्रेक्षागृहाचा असा ताबा घेतला की, जणू त्या डॉल्बी सभागृहाचे छप्पर उडाले. अशाच प्रकारचा जल्लोष ए. आर. रेहमान आणि गुलजार यांच्या ‘जय हो’ने केला होता. natu natu song oscar प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी जगभरातील सिनेइंडस्ट्री आटोकाट प्रयत्न करते, तो उद्देश नाटू नाटूने निश्चितच सफल केला आहे.
आताशी भारतीय चित्रपट आंतरराष्ट्रीय मंचावर ब-यापैकी मुद्रा कोरू लागले आहेत. या सा-यात मराठी चित्रपट कुठे? असा प्रश्न निश्चितच उपस्थित होऊ शकतो. विभिन्न चित्रपटांना, गाण्यांना, अभिनेत्यांना अथवा अभिनेत्रींना मिळणा-या पुरस्कारांमध्ये प्रत्येक वेळी गुणवत्ता हा एकमेव घटक असतो असे नाही. natu natu song oscar अनेक घटकांमधील तो देखील एक घटक असतो. पण ज्याप्रमाणे तेलगु रसिक तेथील चित्रपटांना गर्दी करतात, तेवढी गर्दी मराठी रसिक करतात का, हा प्रश्न उपस्थित केला जायला हवा. ‘बाहुबली’सारख्या भाषिक चित्रपटावर प्रचंड खर्च करण्याचे धाडस निर्माते दाखवू शकतात. natu natu song oscar कारण त्यांना मायबाप रसिकांच्या पाठिंब्याची खात्री असते. मराठी रसिक श्रोते मराठी निर्मात्यांना अशी खात्री देऊ शकतील? त्यांच्या परिश्रमांचे चीज करतील? मराठी चित्रपट मुंबई, पुणे, डोंबिवली, नाशिक आणि लातूर, औरंगाबादच्या पुढे जात नाही. विदर्भात तर मराठी चित्रपट निर्मिती नगण्यच आहे. मग त्यांना दादही न च्या बरोबरच आहे. natu natu song oscar असो. ऑस्कर मुद्रांकनाने सा-या भारतीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. येणा-या काळात ऑफबिट विषय घेऊन निर्मात्यांनी यावे आणि सरकारच्या पाठबळाची अपेक्षा न करता स्वतःच ऑस्करच्या शर्यतीत स्वतःला झोकून द्यावे.
natu natu song oscar खरे तर ऑस्कर म्हणजे काही यशोशिखर नव्हे; पण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जर जग एक लहानसे खेडे झाले असेल, तर ज्याप्रमाणे पाश्चिमात्य विचार, आचार, कल्पना, तंत्रज्ञान तिकडून इकडे येत आहे तर आपलेही विचार, आपलीही कथानके, आपल्याही संकल्पना सातासमुद्रापार जायला नको का? natu natu song oscar ऑस्कर हे त्यासाठीचे द्वार आहे. त्यातून प्रवेश करूनच आपण चित्रपटसृष्टीतील नवआचार-विचारांचे सोने लुटायला हवे. आज नाटू नाटू हे निव्वळ गाणे राहिलेले नाही. ते केवळ नृत्यही राहिलेले नाही. त्यात निव्वळ तेलगू संवेदनाही राहिलेल्या नाहीत. ऑस्कर पुरस्कार कवेत घेत ते आशियाई आकांक्षांचे प्रतीक झाले आहे. natu natu song oscar जणू जोशात नाचत ते सांगतेय्, आम्ही आता जगाच्या रंगमंचावर आमचा वाटा मागणार! इतके वर्ष अव्हेरले; पण आता नाकारू शकणार नाही. भारताकडे जगाला देण्यासाठी बरेच काही आहे. natu natu song oscar एकीकडे भारत निरनिराळ्या क्षेत्रात प्रगती करीत असताना हळूहळू चित्रपट उद्योगातही तो पाय पसरवू लागला आहे.
अनेक प्रादेशिक चित्रपटांनी बॉलिवूड सिनेमांवरही कुरघोडी केलेली आहे. natu natu song oscar अशातच तो सातासमुद्रापार उड्डाण घेण्यास सज्ज झाला आहे. भारताला हजारो वर्षांची परंपरा आहे. महाभारत, रामायणातील पात्रांमध्येही अनेक कथाबीजे लपलेली आहेत. त्या पात्रांचा अभ्यासही चित्रपट निर्मात्यांना ऑस्करवर मोहोर उमटवून देऊ शकतो. natu natu song oscar पुराणातील अनेक कथानकांवर मालिका निघत आहेत, पण त्यावर चित्रपटनिर्मिती करून, निश्चितच निर्माते ऑस्करच्या रांगेत उभे राहू शकतात. या पर्यायांचासुद्धा विचार केला जायला हवा. natu natu song oscar नवे निर्माते, नव्या प्रादेशिक भावभावना, नवकलाकारांचा समुच्चय साधत नव्या संकल्पनांना गवसणी घातली गेल्यास आंतरराष्ट्रीय पटलावर भारतीयांना आणखी पुरस्कार पटकावण्यात मुळीच अडथळे येऊ नयेत. natu natu song oscar देशातील बदलत्या वातावरणाचा फायदा घेतला गेला तर अवघी चित्रपटसृष्टी अर्थप्रवाही झाल्याशिवाय राहणार नाही.