चाळीसगावचा भूमिपुत्र बनला आंतरराष्ट्रीय संशोधक

चाळीसगाव : आपल्यात सिद्ध, चिकाटी आणि प्रचंड मेहनत असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येतं, याच उदाहरण म्हणजे तालुक्यातील मेहुणबारे येथील युवक पार्थ पवार. पार्थ याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन केंद्रात संशोधक पदापर्यंतची भरारी घेतली आहे. पवार यांची आंतरराष्ट्रीय भारत संशोधन केंद्र, वाराणसी येथे वैज्ञानिक म्हणून निवड झाली आहे. विशषेतः या भरारीमुळे अनेक युवकांना प्रेरणा मिळणार आहे.

पार्थ पवार यांनी एम टेक महाराणा प्रताप युनिव्हर्सिटी, उदयपूर येथून पूर्ण केले आहे. सध्या ते नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन, गांधीनगर गुजराथ येथे कार्यरत आहेत. जगात भाताचे पीक घेताना त्याचे उत्पन्न वाढावे, यासाठी यांत्रिकीकरणाची आवश्यकता असते. या यांत्रिकीकरणाचे संशोधन करून नवनवीन मशिन आणणे या आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेत होणार आहे.

या संस्थेचे जगात सहा संशोधन केंद्रे असून, त्यात भारतातील त्याचे मुख्यालय वाराणसी येथे एक केंद्र आहे. त्यात केद्रांतर्गत भारत, बांगलादेश, नेपाळ व श्रीलंका या देशांचा समावेश आहे. फॉम मशिनरीचे यांत्रिकरणाचे संशोधन केले जाणार आहे. अशा पार्थ पवार यांच्या यशानं सर्व थरातून कौतुक होत आहे.

“जिद्द, चिकाटी आणि स्वतःवर विश्वास असल्याने मी सतत अभ्यास करत गेलो.अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांचा स्वतःवर विश्वास असेल आणि मेहनत करण्याची जिद्द असेल आणि संयम ठेवला तर यश नक्कीच मिळते. प्रत्येक संधीचे सोन करणे हे आपल्या हातात असते. आत्मविश्वास, जिद्द, मेहनत, संयम ही यशाची गुरुकिल्ली आहे.” – पार्थ पवार, चाळीसगाव