तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव : भुसावळ येथे योजित लग्न समारंभातून परप्रांतीय चोरटयांनी दोन लाख नऊ हजारांचा ऐवज असलेली पर्स लांबवल्याची धक्कादायक घटना सोमवार, 6 रोजी रात्री 10.20 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी संशयित कुणालकुमार जितेंद्रकुमार (कडिया, जनपद, राजगढ, ह.मु.भुसावळ) व अन्य एका अनोळखीविरोधात बाजारपेठ गुन्हा दाखल करण्यात आला.
लग्नात चोरट्यांनी साधली संधी
शहरातील कर सल्लागार सतीश बद्रीनारायण शर्मा (सुरभीनगर) यांची कन्या रश्मीचे सोमवारी रात्री शहरातील बालाजी लॉनमध्ये विवाह समारंभ आयोजित करण्या आला होता. शर्मा दाम्पत्य लग्नाच्या गडगडीत स्टेजवर असताना चोरट्यांनी संधी साधत त्यांच्या पत्नीची दोन लाख नऊ हजारांचा ऐवज असलेली पर्स लांबवली.
या पर्समध्ये 10 हजारांची रोकड, 30 हजार रुपये किमतीच्या अंगठ्या, 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे टॉप्स, 60 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, नऊ हजारांची नथ, पाच हजार रुपये किमतीची पोत, पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण दोन लाख नऊ हजारांचा ऐवज होता.
दरम्यान, शर्मा यांना पर्स चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी लॉनमधील सीसीटीव्ही तपासल्यानंतर त्यात एक चोरटा पर्स चोरी करताना दिसून आला तर बाजारपेठ पोलिसात धाव घेतल्यानंतर गुन्हे शाखेच्या कर्मचार्यांनी काही संशयितांचे फोटो दाखवल्यानंतर एकाची ओळख पटल्यानंतर त्याच्यासह साथीदाराविरोधात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला.