---Advertisement---
भुसावळ प्रतिनिधी : भुसावळ विभागाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या ऑक्टोबर महिन्यात विविध स्त्रोतांमधून उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ नोंदवली आहे. या कालावधीत विभागाने उत्कृष्ट कामगिरी करत एकूण ₹138.72 कोटींचे महसूल मिळवले आहे, जे ऑक्टोबर 2024 च्या तुलनेत 15% अधिक आहे. हे यश भुसावळ विभागातील अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न व संघभावनेचे प्रत्यक्ष उदाहरण आहे.
ऑक्टोबर 2025 मध्ये मिळालेले महसूल
प्रवासी उत्पन्न: ₹78.10 कोटी
इतर कोचिंग उत्पन्न: ₹8.30 कोटी
मालवाहतूक उत्पन्न: ₹52.32 कोटी
विविध उत्पन्न: ₹2.15 कोटी
तिकीट तपासणी मोहिमांमधून मिळालेले महसूल: ऑक्टोबर 2025 मध्ये विनातिकीट / अनियमित तिकीट / बिनपावतीसह माल वाहून नेणाऱ्या एकूण 1,08,940 विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करताना विभागाने त्यांच्याकडून ₹9.94 कोटी दंड वसूल करण्यात आला.(निर्धारित लक्ष्यापेक्षा 92% अधिक)
ऑक्टोबर 2025 मध्ये भुसावळ विभागाच्या प्रमुख उपलब्ध्या: दिवाळी व छठपूजा सणानिमित्त प्रवासी संख्येत झालेल्या मोठ्या वाढीच्या पार्श्वभूमीवर भुसावळ विभागात प्रवासी व्यवस्थापनासाठी सर्वांगीण गर्दी नियंत्रण व्यवस्था प्रभावीरीत्या अंमलात आणण्यात आली.
, रेल मदत कार्यप्रदर्शन – ऑक्टोबर 2025 साठी :तक्रार निराकरणाच्या सरासरी वेळेसंदर्भात भुसावळ विभागाने भारतीय रेल्वेमध्ये तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.
, मूर्तिजापूर स्थानकावर दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी मा. खासदार श्री. अनुप धोत्रे व मा. आमदार श्री. हरीश पिंपळे यांच्या हस्ते नूतन प्रवासी लिफ्टचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे मूर्तिजापूर स्थानकावरील प्रवासी सुविधा आणि सोयी-सुविधांमध्ये आणखी भर पडली आहे.
, प्रवाशांच्या सोयीसाठी मोबाइल अनारक्षित तिकीट प्रणाली (M-UTS) विभागातील नाशिक, मनमाड, जळगांव, भुसावळ, अकोला, शेगाव आणि खंडवा या 07 स्थानकांवर कार्यान्वित करण्यात आली आहे. सणासुदीच्या कालावधीत ऑक्टोबर 2025 महिन्यात एकूण 3,245 अनारक्षित तिकिटांची नोंद झाली आहे.
, प्रखर विपणन उपक्रम व ग्राहक संवादामुळे विभागाने ऑक्टोबर 2025 महिन्यात कांद्याच्या 22.5 रेक्सची लोडिंग क्षमता साध्य केली असून त्यामुळे सुमारे रु. 9.5 कोटी इतका मालवाहतूक महसूल प्राप्त झाला आहे. ह्या तुलनात्मकदृष्ट्या मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 1000 टक्के वाढ नोंदविणारे अपवादात्मक यश आहे.
, ऑक्टोबर 2025 महिन्यात तिकीट तपासणीमधून रु. 9.94 कोटी इतका महसूल प्राप्त झाला असून, या कालावधीचे लक्ष्य रु. 5.18 कोटींपेक्षा 215 टक्क्यांनी अधिक कामगिरी नोंदविण्यात आली आहे. ही विभागाची उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे.
भुसावळ रेल्वे प्रशासन प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी सतत नवकल्पना राबवत आहे आणि रेल्वे सेवा अधिक उत्कृष्ट करण्यासाठी कटिबद्ध आहे.
रेल्वे प्रशासन सर्व प्रवाशांना आवाहन करते की, प्रवासादरम्यान वैध व योग्य तिकिटाचा वापर करावा. तसेच, अनारक्षित तिकीट अधिक सुलभ, सुरक्षित व सोयीस्कर बनवण्यासाठी UTS (यूटीएस) मोबाईल अॅपचा जास्तीत जास्त वापर करावा.









