भुसावळ : लग्न कार्याला गेलेल्या वऱ्हाडीच्या घरात अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. भुसावळ शहरातील काझी प्लॉट भागात गुरुवारी (१५ मे) रोजी सकाळी ही घटना घडली. या आगीत सुमारे ५ लाखांचे नुकसान झाले असून, टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रिक सामान व इतर साहित्य जळून खास झाले आहेत. त्यामुळे आता करावे तरी काय असा प्रश्न त्यांच्या समोर ठाकला आहे.
भुसावळ शहरातील काझी प्लॉट भागात इकबाल पिंजारी व फरीद पिंजारी हे दाम्पत्य वास्तव्याला आहेत. गुरुवारी (१५ मे) रोजी सकाळी परिवारातील एका तरुणाचे लग्नकार्य असल्यामुळे ते बुलढाण्याकडे निघाले होते. काही क्षणातच त्यांच्या घरात अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली.
पिंजारी यांच्या घरात आग लागल्याचे परिसरातील नागरिकांना लक्षात येताच त्यांनी तात्काळ धाव घेतली. घरात प्रवेश करून अग्नीशमनदल येईपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. मात्र या अग्नी तांडवामुळे पिंजारी यांच्या घरातील संसाररोपयोगी वस्तू, तीस ते चाळीस हजार रुपये रोख व महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. या आगीत सुमारे ५ लाखांचे नुकसान झाले असून, टीव्ही फ्रीज, इलेक्ट्रिक समान व इतर साहित्य जळून खास झाले आहेत.
याबाबत शेजारी राहणाऱ्या नाजीम यांनी पिंजारी यांना माहिती दिली. घरातील साहित्य खाक झाल्याने पिंजारी कुटुंबीयातील अनेकांना अश्रू अनावर झाले. यावेळी अनेकांनी त्यांना धीर दिला.