भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी परराज्यातील मोटरसायकल चोरट्याला घेतले ताब्यात

---Advertisement---

 

भुसावळ : शहरात मोटारसायकल चोरी करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बाजार पेठ पोलिसांच्या डीबी पथकाने कसून चौकशी करत मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. यात तीन मोटारसायकलसह एका आरोपीला अटक केली आहे.

सुनील पांडुरंग इंगळे (रा. पांडुरंगनाथ नगर, भुसावळ) यांनी त्यांचीच बुलेट (क्र. MH-19-ED-7650) चोरी झाल्याची तक्रार बाजार पेठ पोलिसांमध्ये दिली होती. या चोरीचा तपास करीत असतांना पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गोपनीय सूत्रांकडून चोरट्याची माहिती मिळाली. या मिळालेल्या माहितीनुसार डीबी पथकाने मध्यप्रदेशाकडे कूच केली. डी. बी.पथकाने संशयित आरोपी कारवाई करत अरशद खान अहमदखान (वय 22, रा. खाजा नगर, आझाद नगर, बुरहानपूर) यास ताब्यात घेतले. त्याने ही चोरी, विधीसंघर्षित साथीदारासोबत भुसावळ भागातील मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली.

या मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याच्याकडून खालील तीन मोटारसायकली हस्तगत केल्या: बजाज प्लेटिना 100 ES (क्र. MH-19-DS-3722) — अंदाजे किंमत 50 हजार, बजाज सी.टी. 100 (विना नंबर) — अंदाजे किंमत 50 हजार रुपयांची चेसिस नं. MD2A18AY8HWB05833 इंजिन नं. DUYWHB75911 सह रॉयल एनफिल्ड बुलेट 350 CC (क्र. MH-19-ED-7650) अंदाजे किंमत 1 लाख 25 हजार यांचा समावेश आहे. या कारवाईच्या माध्यमातून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेले २ गुन्हे उघडकीस आले आहेत. चोरीस गेलेल्या मोटारसायकयलींची एकूण किंमत २ लाख २५ हजार रुपये आहे,

ही कारवाई -पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते,तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या यशस्वी ऑपरेशनमध्ये डी.बी.पथकाचे स.पो.नि.नितीन पाटील, उपनिरीक्षक मंगेश जाधव,पोहेकॉ विजय नेरकर,कांतीलाल केदारे,किरण धणगर,रविंद्र भावसार, सुनिल सोनवणे,सचिन चौधरी,हर्षल महाजन,जिवन कापडे,महेंद्र पाटील,जावेद शहा,भूषण चौधरी,अमर अढाडे, प्रशांत सोनार, योगेश माळी,योगेश महाजन यांचा सक्रिय सहभाग होता.या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ विजय बळिराम नेरकर करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---