---Advertisement---

बापरे! बंडलमध्ये एकच नोट असली अन् तब्बल एक कोटी नकली

---Advertisement---

भुसावळ : येथील रेल्वे स्थानकावर तब्बल एक कोटी रुपयांच्या नकली नोटा आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं असून, एक जण फरार झालाय. दरम्यान, तब्बल एक कोटी रुपयांच्या नकली नोटा आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ रेल्वे स्थानकावर पोलिसांना दोन संशयित प्रवाशांवर संशय आला. पोलिसांनी त्यांना थांबवत त्यांची तपासणी केली असता संशयितांच्या बॅगेत एक कोटी नकली नोटा आढळून आल्या. या वेळी दोघांपैकी एक जण पसार झाला तर एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

वरील एक नोट असली तर…
जप्त केलेल्या पाचशे रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये वरील एक नोट असली तर बाकी बंडलमध्ये नकली नोटा आढळून आल्या. यात तब्बल एक कोटी रुपयांच्या नकली नोटा आढळून असल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment