भुसावळ : आषाढी एकादशिनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांकरीता महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे विभागातून नागपूर-मिरज, नवीन अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर विशेष गाड्या धावतील. ०११५९ भुसावळ-पंढरपूर विशेष गाडी भुसावळ येथून १६ जुलैला दुपारी दीडला सुटेल. दुसऱ्या दिवशी १७ जुलैला पहाटे साडेतीनला पंढरपूरला पोहोचेल. ०११६० विशेष गाडी पंढरपूर येथून १७ जुलैला रात्री साडेदहाला सुटेल
दुसऱ्या दिवशी १८ जुलैला दुपारी एकला भुसावळला पोहोचेल. ही गाडी जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी येथे थांबा घेईल. ०१२०५ नागपूर-मिरज स्पेशल (२ सेवा) विशेष गाडी नागपूर येथून १४ जुलैला सकाळी ८ वाजून ५० मिनिटांना सुटेल. दुसऱ्या दिवशी १५ जुलैला ११ वाजून ५५ मिनिटांनी मिरजला पोहोचेल. ०१२०६ विशेष गाडी मिरज येथून १८ जुलैला दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल.
दुसऱ्या दिवशी १९ जुलैला १२ वाजून २५ मिनिटांनी नागपूरला पोहोचेल. अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसाबा डोंगरगाव, जठरगाव धालगाव, कवठेमहांकाळ व सुलगरे या रेल्वेस्थानकावर ती थांबेल.
०१११९ नवी अमरावती-पंढरपूर विशेष (४ सेवा) गाडी नवी अमरावती येथून १३ व १६ जुलैला दुपारी अडीचला सुटेल. दुसऱ्या दिवशी ९ वाजून १० मिनिटांनी पंढरपूरला पोहोचेल. बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी याठिकाणी गाडीला थांबे असतील.
०११२१ खामगाव-पंढरपूर विशेष (४ सेवा) गाडी खामगाव येथून १४ व १७ जुलैला साडेअकराला सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे साडेतीनला पंढरपूरला पोहोचेल. ०११२२ विशेष गाडी पंढरपूर येथून १५ व १८ जुलैला पाचला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री साडेसातला खामगावला पोहोचेल.