---Advertisement---

बापरे ! भुसावळातील ‘या’ पतपेढीत लिपिकाकडून कोट्यावधी रुपयांचा अपहार

---Advertisement---

जळगाव : भुसावळातील प्राथमिक शिक्षकांच्या नूतन सहकारी पतपेढीत लिपिकाने कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. अभिजीत तायडे असे अपहार केलेल्या लिपिकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लिपिक अभिजीत तायडे यांनी 5 ते 7 खात्यांमध्ये सुमारे 1 कोटी 93 लाख 86 हजार 250 रुपये वर्ग केले. पतसंस्थेचे सचिव राजू गायकवाड यांनी खात्यांची तपासणी केली असता ही बाब उघडकीस आली.

याप्रकरणी ज्या खात्यांमध्ये ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे त्या खातेदारांना पतपेढीकडून नोटीस बजविण्यात आल्या असून दोन दिवसात खात्यात वर्ग करण्यात आलेली रक्कम पतपेढीकडे जमा करण्याच्या आदेश या नोटीसद्वारे देण्यात आले आहे.

वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर भडगावात कारवाई

भडगाव : वाक येथील गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करताना एका ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या पथकाने वाक येथे ९ रोजी सकाळी ७:३० वाजता कारवाई केली. अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहेत.

या ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती ग्राम महसल अधिकारी प्रशांत कंभारे. महसल सहायक महादू कोळी यांनी दिली. ही कारवाई तहसीलदार शीतल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील महादू कोळी, गीतेश महाजन, प्रशांत कुंभारे, एम. जे. खाटिक, अभिमन्यू वारे आदींनी केली. हे पथक रात्री गस्तीवर असताना भडगाव येथून वाळू वाहतूक करणारा डंपर दिसला. डंपरवरील चालक हा सुसाट पारोळ्याच्या दिशेने सुटला. त्यामुळे डंपर निसटला. मात्र, त्याचवेळी एका ट्रॅक्टरवर मात्र कारवाई करण्यात आली आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment