नंदुरबार : स्वातंञ्याला आज ७२ वर्ष होत आली आहे मात्र, नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागात आजही नागरिकांना वीज विना जीवन जगावं लागत आहे. असंच एक धडगाव तालुक्यातील भुषा गाव गेल्या अनेक वर्षांपासून अंधारात राहत आहे. या गावात तब्ब्ल ७२ वर्षात प्रथमच महाराष्ट्र राज्य विज वितरण महामंडळ विभागामार्फत विज पोहचली आहे. विशेषतः अनेक वर्षांपासून अंधारात जीवन काढत असलेल्या भुषा वासियांमध्ये आता प्रकाश मिळाल्याने चैतन्य निर्माण झाले आहे.
मुळात भुषा गावाकडे स्थानिक प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधीनी लक्ष न दिल्यामुळे गाव विकासापासून कोसोदुर राहिले. गावात आजही मूलभूत सुविधा नाहीय. परंतु, आता गावातील युवक आधुनिक धावत्या युगात उच्च शिक्षण घेतल्यामुळे गावचे विकास होण्याच सुरवात झालेली आहे.
भुषा गावातील खुटालीपाडा-१, खुटालीपाडा-२, हकतारा, विहिरपाडा, विमानतळपाडा, ओकायापाडा, भुषा पाॅंईट आदी पाड्यावरील ३० ते ४० लाभार्थ्यांना विजचे लाभ होईल.
यावेळी उद्घाटन प्रसंगी सरपंच कुशाल कुल्ला पावरा, माळ सरपंच जाड्या पावरा, लाला पावरा, नटवर पांडुरंग पावरा, दारख्या पावरा, फोपा पावरा कारभारी, मेरसिंग पावरा, बोठड्या मालसिंग पावरा, किसन अरविंद पावरा, कसा पावरा, पंडित पावरा, जेमा पावरा, गुमान खर्डे, युवराज पावरा, सुरत्या पावरा, किर्ता(भिरता) पावरा आदी ग्रामस्थ उपस्थित होते.