---Advertisement---
पारोळा : महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी भूषण कुंटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांनी गुरुवारी (३ जुलै) रोजी कुंटे यांना नियुक्तीपत्र दिले.
राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करताना दिसून येत आहे. अवकाळी पावसामुळे, बोगस बियाणे, खते व प्रशासनच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व त्यांना सामाजिक, आर्थिक, कायदेशीर ज्ञान प्राप्त व्हावे, शेतकरी संघटित व्हावे, यासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या वतीने अहोरात्र कार्य करण्यात येत आहे. यात अधिकाधिक भर पडावी म्हणून संघटनेच्या माध्यमातून नियुक्त्या देण्यात येत आहेत.
कोण आहेत भुषण कुंटे ?
कुंटे यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध विषयांवर संशोधन लेख प्रकाशित केले आहेत. तसेच प्रगत आणि प्रयोगशील शेतकरी म्हणून कुंटे हे एक प्रगत आणि प्रयोगशील शेतकरी म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून संत्रा, तूर, गहू, कापूस, हरभरा व सोयाबीन या पिकांचे यशस्वी उत्पादन घेतले आहे.
शेतकरी हीत जपणार – कुंटे
शेतकऱ्यांचा सर्वांनी विकास हाच माझा ध्यास असून, मी पूर्ण वेळ संघटनेला देणार आहे. मी एक शेतकरी पुत्र असून, शेती व शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या विविध योजनांमधून शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचे कार्य करणार आहे. संघटनेला मजबूत करण्यासाठी संघटनेचे ध्येय, धोरणे व विचार सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी कामगार वर्ग यांच्यापर्यंत पोहोचवणार असून, शेतकरी हीत जपणार आहे, असे मत कुंटे यांनी व्यक्त केले.
दरम्यान, कुंटे यांची नागपूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संघटनेचे सर्व कार्यकर्ते, सदस्य, पदाधिकारी व राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.