शेतकर्‍यांसाठी मोठी घोषणा! देशातील १४ कोटी शेतकर्‍यांना मिळणार लाभ

नवी दिल्ली : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या ९४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकर्‍यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यात ड्रॅगन फ्रूट, आंबा, भाज्या आणि फुलांसाठी बेंगळुरू, जयपूर आणि गोवा येथे तीन सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन केले जाणार आहेत. आतापर्यंत ४९ CoEs मंजूर केले आहेत, त्यापैकी तीन ९ मार्च २०२३ रोजी मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर अंतर्गत मंजूर करण्यात आले आहे, असं कृषी मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

कर्नाटकातील बेंगळुरू येथील हिरेहल्ली चाचणी केंद्रात भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थाद्वारे कमलमसाठी एक CoE स्थापित केले जाईल. भारत-इस्रायल कृती आराखड्याअंतर्गत ओडिशातील जाजपूर जिल्ह्यात आंबा आणि भाज्यांसाठी दुसरा CoE स्थापन केला जाईल. भाजीपाला आणि फुलांसाठी तिसरा CoE भारत-इस्त्रायल कृती योजनेअंतर्गत दक्षिण गोव्यातील पोंडा येथील सरकारी कृषी फार्ममध्ये स्थापित केला जाईल. याचा अनेक शेतकर्‍यांना फायदा होणार आहे.