‘मविआ’च्या सभेपूर्वी राष्ट्रवादीला मोठा धक्का, वाचा सविस्तर

छत्रपती संभाजीनगर : शहरात आज महाविकास आघाडीची सभा होत असून, यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीमधील तीनही पक्षाची एकत्र सभा पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मविआला मोठा धक्का दिला आहे.

नेमकी बातमी काय?
गेल्या काही दिवसांपासून या सभेवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. अशातच, आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. 

महाविकास आघाडीच्या सभेपूर्वी अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी सोडणार आहे. हे सर्व जण शिवसेना पक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

3 माजी नगराध्यक्ष, 6 माजी उपनगराध्यक्ष, 2 माजी नगरसेवक यांच्यासह जवळपास 25-30 पदाधिकारी शिवसेनेत जात आहे. अशी माहिती चॅनलने दिली आहे.

दरम्यान, संध्याकाळी 6 वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये सभेला सुरुवात होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यासह इतर प्रमुख नेते या सभेला उपस्थित राहणार असल्यानं या सभेकडं राज्याचं लक्ष लागलं आहे.