Big Breaking : आदित्य ठाकरेंच्या गाडीला धडकली बाईक

मुंबई : शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गाडीला बाईक धडकली आहे. शिवसेना भवनासमोर ही घटना घडली आहे. संबंधित बाईकस्वाराची पोलिसांकडून आता कसून चौकशी सुरु आहे.

आदित्य ठाकरे शिवसेना भवनला येत होते. ते शिवसेना भवनसमोर दाखल झाले होते. यावेळी त्यांचा ताफा शिवसेना भवनच्या दिशेला टन घेत होते. यावेळी मागून येणाऱ्या बाईकने आदित्य ठाकरेंच्या गाडीला धडक दिली. या धकडकेनंतर आदित्य ठाकरे यांनी स्वत: त्या बाईकस्वाराची विचारपूस केली. बाईकस्वाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.