Big Breaking : उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यामुळे राजकीय वातावरण तापलं, सभेत गोंधळ

नागपूर : उद्धव ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावर असून, आज नागपुरात सभा होतेय. मात्र सभा होण्यापूर्वीच सभेत गोंधळ झाल्याची माहिती समोर येतंय. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितलं आहे.

गोंधळ का?
या दौऱ्यातील अमरावतीच्या सभेत उद्धव ठाकरेंनी राणा दाम्पत्यांसहित सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. ठाकरेंची सभा संपताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांशीही झटापट केल्याची माहिती सूत्रानुसार समोर येत आहे.

उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यामुळे अमरावतीत राजकीय वातावरण तापलं आहे. अमरावतीत ठाकरे गटाने राणा दाम्पत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे यांची सभा संपल्यानंतर ठाकरे गटाने रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं.

उद्धव ठाकरे यांची सभा संपताच ठाकरे गटाकडून रवी राणा व नवनीत राणा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात सुरुवात केली. त्यामुळे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पोलीस व ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांच्यात झटापट झाल्याचं पाहायला मिळालं.