ढगफुटीमुळे गंभीर स्थिती निर्माण झालीय. सर्वत्र हाहाकार उडालाय. अचानक पूर आलाय. त्यात भारतीय सैन्याचे 23 जवान बेपत्ता आहेत. ढगफुटीमुळे तीस्ता नदीला पूर आलाय. सिंगतम भागात ढगफुटीची घटना घडली. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.
आधी ढगफुटी झाली. त्यानंतर इतक पाणी वाढलं की, चुंगथांग धरणातून पाणी सोडावं लागलं. त्यामुळे अचानक पाण्याचा स्तर 15-20 ते फूटाने वाढला. सिक्किममध्ये हे सर्व घडलय. उत्तरी सिक्किममध्ये ल्होनक तळ्याच्यावर अचानक ढगफुटी झाली. त्यामुळे लाचेन घाटीतील तीस्ता नदीला पूर आला, अशी माहिती गुवाहाटी डिफेन्सच्या प्रवक्त्याने दिली.
घाटीतील काही सैन्य संस्थांवर याचा परिणाम झाला. 23 जवान बेपत्ता असल्याची माहिती आहे. शोधकार्य सुरु आहे. लोचन घाटीतून वाहणाऱ्या तीस्ता नदीला पूर आलाय. घाटीतील काही सैन्य ठिकाणी पुराच्या पाण्यात वाहून गेली. 23 जवानांशिवाय आणखी काही जण बेपत्ता असल्याची माहिती आहे.