---Advertisement---

Big Breaking : नंदुरबारात जीएसटी विभागाची छापेमारी; बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई सुरु

---Advertisement---

नंदुरबार : शहरातून मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात एकाच वेळी जीएसटी विभागाने विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी सिमेंट, लोखंड विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती सूत्रानुसार समोर येत आहे. दरम्यान संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सध्या तरी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे.

जीएसटी विभागाच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, अक्कलकुवा, खांडबारा आणि इतर ठिकाणी बांधकाम साहित्याशी संबंधित असलेल्या व्यापारी, व्यावसायिकांच्या दुकानांवर हा छापा टाकण्यात आला आहे. एकाच वेळी जीएसटी विभागाची तपासणी होत असल्याने बांधकाम व्यवसायिक आणि बांधकाम साहित्य विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment