Big Breaking : बैठकीआधीच राज्य सरकारचा मोठा निर्णय, वाचा काय आहे?

आजपासून मराठवाड्यात कॅबिनेटची बैठक होत आहे. औरंगाबाद येथे तब्बल सात वर्षानंतर ही बैठक होत आहे. या बैठकीत एकूण 75 निर्णय होणार आहेत. मराठवाड्यासाठी पॅकेजही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. दरम्यान, या  बैठकीआधीच राज्य सरकारने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे.

राज्य सरकारचे उपसचिव संतोष गावडे यांच्या सहीने राज्य सरकारने अधिसूचना जारी केली आहे. राज्य सरकारने राजपत्र प्रसिद्ध करुन अधिसूचना जारी केली आहे. त्यात उस्मानाबाद जिल्ह्याचे, तालुक्याचे, उप विभागाचे आणि गावाचे नाव आता धाराशिव असणार असल्याचं म्हटलं आहे.

तसेच औरंगाबाद जिल्ह्याचे, तालुक्याचे, उप विभाग आणि गावाचे नाव आता छत्रपती संभाजीनगर असणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेला मोठं गिफ्ट मिळालं आहे.

या आधीही औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव बदलण्यात आलं होतं. पण त्याला कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. त्यानंतर आता सरकारने राजपत्र प्रसिद्ध करून थेट अधिसूचनाच जारी केली आहे.