मुंबई : कोरोनाच्या नव्या व्हेरिंएटने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. देशभरात नव्या रुग्णांची संख्या वाढत असताना इकडे महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या जेएन1 सब-व्हेरिएंटने शिरकाव केला आहे. सिंधुदुर्गातील 41 वर्षीय पुरुषाला Jn1 ची लागण झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
नव्या व्हेरिएंटच्या शिरकावानंतर जिल्हास्तरावर खबरदारी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. इन्फुएन्झा आणि सारीचे सर्व्हेक्षण अधिक सक्षम करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. सोबतच, कोव्हिड चाचण्या वाढवण्यासंदर्भात देखील आदेश दिल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.