Big Breaking! संजय राऊतांना ‘ते’ आवाहन पडलं महागात

Mahrashtra Politics : खासदार संजय राऊत सातत्याने आपल्या भाषणातून विरोधकांवर खरमरीत टीका करतात. प्रत्येकाला ते आपल्या शैलीत उत्तरे देतात. अशात राज्य सरकारविरोधात केलेलं एक वक्तव्य खासदार संजय राऊतांना चांगलच महागात पडलं आहे.

नाशकात संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनतेने या सरकारच्या नियमांचे पालन करु नये, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. काही दिवसांआधीच सत्ता संघर्षावर सुप्रिम कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. यावर सर्वच नेते मंडळी आपली प्रतिक्रिया देत आहेत. तसेच शिंदे ठाकरे असे दोन्ही गट एकमेकांवर टीका करत आहेत. संजय राऊतांनी सरकारविरोधी वक्तव्य केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, राज्यातील सरकार अपात्र आमदारांच्या भरवशावर आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना बेकायदेशीर ठरवलं आहे. त्यामुळे जनतेने घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असलेल्या सरकारच्या नियमांचे पालन करू नये, असं आवाहन संजय राऊतांनी केलं होतं.