Big Breaking! डाॅ. धर्माधिकारी यांनी ‘इतक्या’ लाखांचं मानधन दिलं मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

मुंबई : ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी २५ लाखांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याची घोषणा केली आहे.

आप्पासाहेब धर्माधिकारी या सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले, ‘आजचा हा पुरस्कार माझ्या कार्याचा गौरव आहे, नानासाहेबांनी कष्ट केलं आणि तुम्ही साथ दिली, आजच्या या पुरस्काराचं संपूर्ण श्रेय तुम्हाला जातं. एका घरात दुसरा पुरस्कार देणं ही घटना महाराष्ट्रात आतापर्यंत कुठेही झाली नाही’

‘आम्ही कामाची सुरुवात ही खेडेगावापासून सुरु केली. मी प्रसिद्धीपासून लांब आहे. वस्तू महत्वाची असेल तर तिची जाहिरात करायची गरज काय आहे. मानवता धर्मात प्रत्येक मनुष्याने उभं रहावं. नानासाहेब वयाच्या 87 वर्षापर्यंत काम करत होते. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहील. माझ्यानंतर माझाा मुलगा हे कार्य पुढे नेईन. मला विश्वास आहे. सचिन धर्माधिकारी सुद्धा चांगले काम करेल, असंही धर्माधिकारी म्हणाले.

‘माझ्या आयुष्यातील हा भाग्याचा क्षण, पुरस्कार हा नेहमीच मोठा असतो,तो लहान कधीच नसतो. समाज आणि देशाचे आपल्यावर ऋण आहे, ते आपण फेडले पाहिजे. कोणत्याही प्रसिद्धीशिवाय मी हे काम करत आहे, त्यामुळे तुम्हीही कार्य करा असे देखील धर्माधिकारी यावेळी म्हणाले.