DSK Fraud Case: सीबीआयने बिल्डर दीपक कुलकर्णी (डीएसके) यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल केले आहेत. तसेच कंपनीच्या संचालक मंडळाच्या सदस्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली आहे.
काय प्रकरण आहे?
ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार सीबीआय, स्टेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय, विजया बँक यांनी कुलकर्णी यांच्या कंपनीला एकूण 650 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते.
दिलेल्या कर्जापैकी त्यांनी 433 कोटी रुपयांची परतफेड केली आहे. याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरा गुन्हा डी.एस.के. ग्लोबल एज्युकेशन अँड रिसर्च लि. या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीने सुमारे 156 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे.