‘आता सततचा पाऊस पडल्यास..’ : शिंदे सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज बुधवार रोजी पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

 

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

सलग पाच दिवस पाऊस पडल्यास नैसर्गिक आपत्ती समजली जाणार

ग्राहकांना स्वस्त दरात वाळू, रेती उपलब्ध होणार. सुधारित रेती धोरणास मान्यता. रेती लिलाव बंद. (महसूल विभाग)

नागपूर मेट्रो रेल टप्पा- २ प्रकल्पास सुधारित मान्यता. ४३.८० किमीचा मेट्रो मार्ग उभारणार.

देवनार डम्पिंग मैदानावर कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी आरक्षणात फेरबदल.

सेलर इन्स्टीट्यूट “सागर” भारतीय नौदल, मुंबई या संस्थेस नाममात्र दराने भाडेपट्टा नुतनीकरण.

अतिविशेषोपचार विषयातील पदव्युत्तर पदवी विद्यार्थी संख्येत वाढ करणार. सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक संवर्गातील १४ पदे निर्माण करणार.

महावितरण कंपनीस कर्ज घेण्यास शासन हमी.

अकृषि विद्यापीठातील शिक्षक समकक्ष पदांना सहावा व सातव्या वेतन आयोग लागू करण्यास मान्यता

नॅक, एनबीए मूल्यांकनासाठी मार्गदर्शन करण्याकरिता परिस स्पर्श योजना.