नवी दिल्ली : परदेशी विद्यापीठांसाठी युजीसीने मोठा निर्णय जाहीर केला आहे. भारतात शाखा उघडणार्या परदेशी विद्यापीठांना ऑनलाइन वर्ग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही, अशी माहिती यूजीसीचे प्रमुख एम जगदेश कुमार यांनी दिली आहे. मात्र, भारतात कॅम्पस उभारणार्या परदेशी विद्यापीठांना त्यांची स्वतःची प्रवेश प्रक्रिया आखण्याचे स्वातंत्र्य असेल असे जगदेश कुमार यांनी स्पष्ट केले. भारतात कॅम्पस सुरू करणार्या परदेशी विद्यापीठांना केवळ फिजिकल मोडमध्ये पूर्णवेळ प्रोग्रॅम घेऊ शकतात मात्र, ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षण देऊ शकत नाहीत.
एम जगदेश कुमार म्हणाले की, परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस स्थापन करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मंजुरीची आवश्यकता असेल. प्रारंभिक मान्यता १० वर्षांसाठी असेल. देशात कॅम्पस असलेली परदेशी विद्यापीठे केवळ फिजिकल मोडमध्ये पूर्णवेळ कार्यक्रमांचे आयोजन करू शकते. मात्र, ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षण देऊ शकत नाहीत. या विद्यापीठांना त्यांची स्वतःची प्रवेश प्रक्रिया आणि फी संरचना तयार करण्याचे स्वातंत्र्य असेल, असे एम जगदेश कुमार म्हणाले.