तरुण भारत लाईव्ह । १० एप्रिल २०२३ : वाढत्या महागाईमुळे जनता होरपळून निघत आहे. एकीकडे सर्वच गोष्टी महाग होत असताना त्यात काहीसा दिलासा सर्वसामान्यांना खाद्यतेलांच्या किंमतीमध्ये मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्य तेलाची मागणी आणि दर कमी झाल्याने देशात खाद्यतेलाचे दर कमी झाल्याचा पाहायला मिळतंय. खाद्य तेलाच्या किमतीत जवळपास 22 ते 25 टक्क्यांनी घट झाली आहे.
गेल्या हंगामात मोहरीचे तेल 165 ते 170 रुपये लिटर या किमतीत विकले जात होते, आता ही किंमत कमी होऊन 130 ते 135 रूपये प्रति लिटरवर आली आहे. मोहरीने गेल्या वर्षीचाच ट्रेंड कायम ठेवल्याने गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील एका महिन्यात मोहरीचे तेल 10 टक्के, सोयाबीन तेल 3 टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. मागणी घटल्याने सोयाबीन खाद्य तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. रिफाइंड सोयाबीन तेलाचा भाव 140-145 रुपयांवरून 115-120 रुपये प्रति लिटर आणि सूर्यफूल तेलाचा दर वर्षभरात 135-140 रुपयांवरून 115-120 रुपयांपर्यंत खाली आला आहे.
खाद्य तेलाचे दर स्वस्त होत असताना दुसरीकडे आता इंधन दरवाढीचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तेल उत्पादक देशांनी तेलाचं उत्पादन दिवसाला तब्बल 10 लाख बॅरेलनं कमी करण्याता निर्णय घेतला आहे.