तरुण भारत लाईव्ह । २३ मे २०२३। जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्यासह चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. घसरणीसह सोन्याचा दर ६० हजाराखाली आला आहे. मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर आज मंगळवारी सकाळच्या सत्रात सोन्यासह चांदीच्या किमतीत घसरण झालेली दिसून येत आहे.
मल्टी-कमोडिटी एक्सचेंज वर सकाळी १०.३० वाजेपर्यंत सोन्याचा दर ३३६ रुपयांनी घसरून ६०,१९५ रुपयावर व्यवहार करत आहे. सोबतच चांदीच्या किमतीत ४७३ रुपयाची मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे एक किलोचा दर ७२,२६० रुपयावर व्यवहार करत आहे.
दुसरीकडे जळगाव सराफ बाजारात गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ आल्याने सोन्याचा दर पुन्हा ६१ हजारावर गेला. सध्या २२ कॅरेट सोन्याचा ५६,४०० रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळा इतका आहे. २४ कॅरेट सोने ६१,५०० रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा दर ७२,२०० रुपये (विनाजीएसटी) इतका आहे.