---Advertisement---
Jalgaon Gold-Silver Rate : जळगाव सुवर्णपेठेत सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. चांदी प्रतिकिलो १ लाख ४८ हजार रुपयांपर्यंत मजल मारली आहे. तर सोने एक लाख १८ हजार २०० रुपयांवर पोहोचले आहे.
दरम्यान, काही दिवसांपासून चांदीच्या दरात वेगाने वाढ होताना दिसत आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ११ हजार ७५० रुपयांवर गेला आहे. जीएसटी धरुन सोने १२ हजारांवर गेले आहे. तर चांदीचा वेगाने वाढणारा दर पहाता चांदी दीड लाखांपर्यंत पोहचली आहे.
दर वाढीचे काय आहे कारण ?
अमेरिकेत व्याजदर कपातीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती सलग सातव्या दिवशी वाढल्या आहेत. आरबीआयने रेपो दर ५.५% वर कायम ठेवला. आरबीआयच्या निर्णयापूर्वी, सोने ₹११७,३५० प्रति १० ग्रॅम या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले होते. सध्या, भारतीय बुलियनवर सोने ₹११७,६३० प्रति १० ग्रॅम या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले आहे.
यापूर्वी, २३ सप्टेंबर रोजी, सोने ₹११४,३६० प्रति १० ग्रॅम या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले होते, तर १५ सप्टेंबर रोजी ते ₹११०,००० वर विकले जात होते. अमेरिकेतील बंद सुरू झाल्यापासून सोन्याच्या किमती वाढल्या आहेत.
दिल्लीत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,१७,२१० रुपये, मुंबईत १,१७,४२० रुपये, बेंगळुरूमध्ये १,१७,५१० रुपये, कोलकातामध्ये १,१७,२६० रुपये आणि चेन्नईमध्ये १,१७,७६० रुपये आहे. इंडियन बुलियन असोसिएशनमध्ये चांदीचा भाव प्रति किलो १,४४,६५० रुपये आहे.
---Advertisement---