Gold Silver Rate : सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; जाणून घ्या ताजे दर

नवीन वर्षाच्या पहिल्या 10 दिवसांत सोने आणि चांदीच्या किमतींनी जबरदस्त उसळी घेतली आहे. यामध्ये प्रत्येकी 2 हजार रुपयांची वाढ झाली आहे. मध्यंतरी स्थिर असलेली चांदी पुन्हा चमकली असून सोन्यानेही जोरदार झेप घेतली आहे.

दहा दिवसांत सोनं 2 हजार रुपयांनी महाग झालं. आठवड्याच्या सुरुवातीला दर स्थिर होते, परंतु बुधवारी 100 रुपयांची वाढ, गुरुवारी 380 रुपये, तर 10 जानेवारीला 270 रुपयांची भर पडली. तीन दिवसांत एकूण 650 रुपयांची उसळी घेतल्याने 22 कॅरेट सोन्याचा भाव आता ₹73,000 प्रति 10 ग्रॅम झाला आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर ₹79,620 प्रति 10 ग्रॅम आहे.

दुरीकडे चांदीनेही जोरदार झेप घेतली आहे. गेल्या आठवड्यात 2 हजार रुपयांनी महागलेली चांदी सोमवारनंतर पुन्हा 1 हजार रुपयांनी वधारली. 10 जानेवारी रोजीही तिने 1 हजार रुपयांची झेप घेतली. सध्या चांदीचा प्रति किलो दर ₹93,500 इतका आहे.

IBJA नुसार सोन्या-चांदीचे ताजे दर

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA):

24 कॅरेट सोन्याचा दर: ₹78,018
23 कॅरेट सोन्याचा दर: ₹77,706
22 कॅरेट सोन्याचा दर: ₹71,465
18 कॅरेट सोन्याचा दर: ₹58,514
14 कॅरेट सोन्याचा दर: ₹45,641
चांदीचा प्रति किलो दर: ₹90,268

कराचा परिणाम आणि ग्राहकांना फायद्याची अपेक्षा

गेल्या वर्षी अर्थसंकल्पात आयात शुल्क 15% वरून 6% करण्यात आल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. सध्या जीएसटी 3% वरून 1% करण्याची मागणी होत आहे. यामुळे सोने-चांदी खरेदीचा अतिरिक्त खर्च आणखी कमी होईल.

भाव कसे जाणून घ्याल?

ग्राहक घरबसल्या सोने-चांदीचे दर जाणून घेऊ शकतात. यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास ताजे दर कळतील. दरम्यान, वायदे बाजारात कोणतेही शुल्क नसते, तर सराफा बाजारात स्थानिक करांमुळे किंमतीत तफावत दिसून येते.