Big News : आधी आरक्षण द्या, मग भरती; नक्की काय म्हणाले जरांगे ?

मनोज जरांगे यांनी आज शिष्टमंडळाशी चर्चा केली, त्यानंतर ते आता मराठा समाजाशी संवाद साधत आहेत. यावेळी बोलताना त्यांनी १००% आरक्षण मिळेपर्यंत मोफत शिक्षण द्या अशी मागणी केली आहे, तर आरक्षण मिळेपर्यंत भरती करू नका असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि सरकारचे शिष्टमंडळ यांच्यामध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं. शिष्टमंडळासोबतच्या भेटीनंतर जरांगे पाटील यांनी वाशीतील शिवाजी चौकात सभा घेतली. यावेळी त्यांनी सरकारचा जीआर समाज बांधवांना वाचून दाखवला. तसेच सरकारने मान्य केलेले मुद्दे समोर मांडले.

सरकारसोबत चर्चा झाली. त्यांचे मंत्री आले नव्हते. सचिव आले होते. सारासार निर्णय घेऊन ते आपल्यापर्यंत आले होते. नोंदी देण्यासाठी गावागावत शिबिर सुरु करण्यात येणार आहेत. ५४ लाख मराठ्यांना प्रमाणपत्र मिळतीलच. ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांच्या सर्व परिवाराला देखील प्रमाणपत्र देण्यात यावे. अशा २ कोटी मराठ्यांना प्रमाणपत्र मिळू शकते, असं पाटील म्हणाले.