नंदुरबार । एकीकडे लोकसभा निवडणुकींचे बिगुल वाजले असतानाच शिवसेना ठाकरे गटाची गळती सुरूच असून याच दरम्यान आता उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला. नंदुरबार जिल्ह्यातील ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय.
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी चेहरा म्हणून आमदार आमश्या पाडवी यांच्याकडे पाहिलं जाते. मात्र लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आमदार आमश्या पाडवी यांच्यासोबत जिल्ह्यातील ठाकरे गटातील अनेक मोठे चेहरे शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.
दरम्यान, आम्ही अतिदुर्गम भागातील असून आमचा पाहिजे तसा विकास झाला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगले काम करत आहेत. आमच्या भागातील विकासासाठी आम्ही शिंदे गटात प्रवेश केला, असे मत आमदार आमश्या पाडवी यांनी व्यक्त केले.